BHAKAR.jpg 
छत्रपती संभाजीनगर

भाकर टांगणीला ! शोधाशोध रानमेव्याची, 'ही' कहाणी काळदरीच्या आदिवासी बांधवांची! 

यादव शिंदे

जरंडी (औरंगाबाद) : पाच महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आणि अनलॉक मध्ये होरपळलेल्या आदिवासी नागरिकांची हातांची कामे बंद होती. त्यामुळे घरातच बसून असलेल्या आदिवासींनी चक्क पोटाची भाकर घरातच टांगणीला बांधून दिवसभर रोजगाराच्या शोधात भटकंती सुरु केली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी तयार करून ठेवलेली भाकर घरातच झोपाळ्या सारखी टांगून काळदरीचे आदिवासी बांधव दिवसभर रोजगाराच्या शोधात भटकंती करून जंगलात मिळालेल्या रानमेव्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत आहे. या आदिवासी समाजातील ग्रामस्थांच्या हातांना कामे नाही. त्यामुळे कुटुंबाचे पोट कसे भरावे असा प्रश्न उभा राहिला आहे. पाच महिन्यापासून कोरोना संसर्गामुळे विस्कळीत झालेली कामांची घडी आणि त्यातच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या दयनीय अवस्थेमुळे बंद असलेली शेतीकामे यामुळे काळदरी शिवारातील आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

शेतीकामेही ठप्प असल्याने रोजगारासाठी जंगलात भटकंती करून रानमेवा संकलित करण्याचा उद्योग हाती घेतला आहे. त्यासाठी कुटुंबाची पोट भरण्यासाठी केलेली चुलीवरची भाकरी झोक्यासारखी टांगून हे आदिवासी ग्रामस्थ दिवसभर रानमेवा गोळा करत भटकंती करतात. जंगलात मिळालेल्या रानमेव्या सोबत या भाकरीची चव घेत आहे. हातांना कामे नाही शासनाने अद्यापही सोयगाव तालुक्यात कोणतेही रोजगार हमी योजनांचे कामे हाती घेतली नाही. त्यामुळे या आदिवासी ग्रामस्थांवर पोटाची खळगी भरण्याचे संकट ओढवले आहे. आर्थिक समीकरण बिघडल्याने पहाटे भाकरी थापाव्या आणि त्या भाकरी सोबत खाण्यासाठी रानमेवा संकलित करून आणावा हाच नित्यक्रम या आदिवासी ग्रामाथांचा सुरु झाला आहे.

पहाटेच्या प्रहरात चुलीवर करून ठेवलेली भाकरी सुरक्षित राहावी यासाठी या भाकरीचे टोपले दोरीने झोका करून घरातच टांगून हे आदिवासी ग्रामस्थ या भाकरी सोबत खाण्यासाठी रानमेवा संकलित करून आणतात. काही रानमेवा विक्री करून कुटुंबाची गरज भागवितात त्यामुळे अडचणीत आलेल्या या ग्रामस्थांना शासन पातळीवरून मदत व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. हातांना कामे मिळावी अशी मागणी या आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सलमान खानच्या आजोबांना मिळालेला जमिनीत गाडलेला खजिना; त्यांनी त्या पैशांचं काय केलं? सरकारला न देता सरळ...

Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यात मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंख' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

Zimbabwe Cricket : सर्व अपराजित संघ एकाच 'ग्रुप'मध्ये! श्रीलंकेला नमवून झिम्बाब्वेने नोंदवले '७' विक्रम; भारताविरुद्ध सामना कधी?

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत शेअर केला २३ वर्षांचा प्रवास

Latest Marathi News Live Update : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त

SCROLL FOR NEXT