crime logo.jpg 
छत्रपती संभाजीनगर

हवेत गोळीबार करुन बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, औरंगाबादेतील थरारक घटना.   

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : हवेत गोळीबार करीत एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. शहरातील देवानगरी भागात बुधवारी (ता.04) सकाळी अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

पांढऱ्या रंगांच्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार अज्ञात हल्लेखोरांनी बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे. नदीम पठाण राउफ पठाण असं अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असल्याचे पोलिसांकडून कळले आहे. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाच्या फोरव्हिलरमधून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी देवानगरी भागातील पीडव्ल्यूडी कॉलनीत हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराचे काम ठेकेदार नदीम पठाण राऊफ पठाण यांनी घेतलेला आहे. ते सकाली साईडवर आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेतली.

त्याचवेळी अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांना धक्का देत यांना गाडीमध्ये ढकलत हवेत गोळीबार करून तेथून पसार झाले.

हवेत फायरिंग झाल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले, त्यावेळी हल्लेखोरांनी तोपर्यंत पळ काढला होता. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाऴे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांच्यासह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : टीएमसीच्या दोन्ही गटांना नवी नावे आणि निवडणूक चिन्हे; ममता बॅनर्जी गटाला फुटबॉल, तर बंडखोर गटाला लिफाफा

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

SCROLL FOR NEXT