crime logo 11.jpg 
छत्रपती संभाजीनगर

प्रेमसंबंधाच्या संशयावरून हॉटेल नोकराचे अपहरण 

सुषेन जाधव

औरंगाबाद : पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पाच जणांनी हॉटेलातील नोकराचे अपहरण केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (ता.११) रात्री घडली. पाचही संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने संशयितांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

याप्रकरणी अरुण संपत बनसोडे (४२, रा. प्रबुद्धनगर, पानचक्की) यांचा पुतण्या योगेश हा मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेलात काम करतो. ११ ऑक्टोबर रोजी रात्री भाऊ पंकजला योगेशने फोन केला. त्यामुळे पंकज त्याला भेटण्यासाठी हॉटेलला गेला. त्यानंतर पंकजने अरुण बनसोडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा तो जोरजोरात ओरडत होता. काही जण मारहाण करत असल्याचे मोबाईलवर ऐकायला येत होते.

त्यामुळे अरुण बनसोडे व त्यांची मुले अजय व पंकज असे तिघेही हॉटेलच्या दिशेने गेले. तेव्हा योगेश व पंकजचे रात्री साडेआठच्या सुमारास कारमधून (एमएच-२०, ईवाय-९५९६) अपहरण केल्याची माहिती सुमित ऊर्फ हसमुख बावस्कर यांनी दिली. त्यामुळे अरुण बनसोडे यांनी लगेचच क्रांती चौक पोलिसात माहिती दिली.

पोलिसांनी क्रांती चौकात अपहरणकर्त्यांना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी सुनील माणिकराव साबळे (४१, रा. वडखा, वरझडी), तुळशीराम संपत गढवे (४९, रा. डोंगरगाव शिव, ता. फुलंब्री), सागर नवनाथ ठिल्लारे (२१, रा. बजाजनगर), कल्याण संपतराव होर्शिल (४४, रा. वडगाव कोल्हाटी, सलामपुरेनगर, ता. गंगापूर) आणि सतीश सांडूजी बनकर (२९, रा. गल्ली क्र. १, ब्रिजवाडी, चिकलठाणा एमआयडीसी) यांना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत. पोलिसांनी संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, पाचही आरोपींना गुरुवारपर्यंत (ता.१५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

(Edited By Pratgap Awachar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT