Baby's umbilical cord Aurangabad News  
छत्रपती संभाजीनगर

(Video) महत्त्वाची बातमी: कोरोना आकाराने मोठा, बाळाला नाही धोका

सुषेन जाधव

औरंगाबाद:  लॉकडाऊनमुळे गर्भवती घराबाहेर पडण्यास घाबरतात, डॉक्टरांनी वेळोवेळी दिलेल्या सर्व चाचण्या, सोनाग्राफी करण्यासाठीही पुढे येत नाहीत, त्रास झाला तरी घरात बसतात असे चित्र पहावयास मिळत असून हे गंभीर आहे. त्यामुळे गर्भवतींनो घाबरु नका गं, आम्ही जीव धोक्यात घालून तुमच्यासाठीच हॉस्पीटलमध्ये बसतोत, अशी आर्त साद स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रेरणा देवधर यांनी गर्भवतींना घातली आहे.

गर्भवती डॉक्टरांचा सल्ला न मानता स्वतःबरोबरच होणाऱ्या बाळालाही धोका पोहोचवत असल्याचे डॉ. देवधर ‘सकाळ’ शी बोलताना म्हणाल्या. डॉ. प्रेरणा म्हणाल्या, कोरोनामुळे गर्भवतींमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. त्यामुळे रेग्यूलर चेकअपसाठीही त्या पुढे येत नाहीत. काही घरांमध्ये तर घरातल्या लोकांनीही जाऊ नको म्हणून घाबरवल्याची परिस्थिती आहे. मुख्य म्हणजे लॉकडाऊन आहे म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी, रक्त तपासणी आदिंच्या दिलेल्या तारखा चुकवू नका. अशा कामासाठीही पोलिस सहकार्य करतात.

लॉकडाऊन असले तरीही हॉस्पीटलमध्ये रेग्यूलर चेकअप आणि प्रसूती सुरु आहेत. स्वतःहून पॅनिक स्थिती निर्माण न करता काळजी घ्या कारण गरोदरपणात स्वतःसह दोन जीव संभाळायचे असतात. बाळाला कोरोनाच्या संसर्गापासून वाचवणं हे जितकं गरचेचं असतं तितकंच स्त्रीचं बाकीचंही आरोग्य पाहणं महत्त्वाचं आहे. गरोदर महिलेच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्य संभाळणे गरचेचे असते.

गर्भवतीने दिवसातून कमीतकमी तीन लिटर पाणी प्यावं. दोनवेळेस लिंबू शरबत. गरोदरपणात शिळे अन्न न खाता ताज्या भाज्या खाव्यात. कामाशिवाय उगीचच घराबाहेर पडू नये, अगदी जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठीही घरातल्या सदस्यांना पाठवा. हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

घाबरु नका : नाळेद्वारे कोरोना बाळाकडे जात नाही
कोरोनाचा विषाणू लहान आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी इतकाही लहान नाही. कोरोनाचा विषाणू साईजमध्ये मोठा असल्याने बाळाला नाळेच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होत नाही. गरोदरपणात कोरोना झाला तरी बाळाला बाळाला होत नाही. अशा दोन तीन गर्भवती प्रसूती अशा झाल्या आहेत. त्यामुळे अगदी फ्लू सारखा आजार असल्याने गर्भवतींनी घाबरुन जाऊ नये. व्यायामासाठी बाहेर न जाता घरातल्या घरात चाला. गर्भवतींसाठी प्रत्येक तीन तीन महिन्यांचे व्यायाम असतात. श्‍वासांचे व्यायाम करा. योगा, प्राणायम करा. 

आपलं कसं होईल, व्यवस्थित होईल की नाही याचं आधीच गर्भवती टेन्शन घेतात. लॉकडाऊनमध्ये टेन्शन, नैराश्‍य येणे यासारखे प्रकारही वाढल्याचे माझे निरीक्षण आहे. आत्मिक समाधान मिळेल अशा गोष्टी करा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. रात्री बेरात्री सिनेमे, टीव्ही पाहू नका, दिनचर्या वेळेत पूर्ण करा. खाण्याच्या वेळा पाळा. डॉक्टारांनी दिलेली औषधं, सल्ला पाळा. 
-डॉ. प्रेरणा देवधर, स्त्रीरोगतज्त्र, कमलनयन बजाज रुग्णालय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT