Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

बिबट्याने फाडल्या सिंदोनच्या उपसरपंचाच्या गायी

संकेत कुलकर्णी

औरंगाबाद : करमाड परिसरातील बिबट्याची कथित दहशत शमते न शमते, तोच सिंदोन परिसरात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दोन गायी ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेतावरील जखमा पाहता, हा बिबट्याचाच हल्ला असल्याचा दावा वन्यजीव अभ्यासक आणि गावकऱ्यांनी केला आहे. 

डिसेंबरपासून करमाड पंचक्रोशीत बिबट्या दिसल्याच्या चर्चेला उधाण आले होते. एक जानेवारीला शेंद्रा बन शिवारातील डोंगरावर तो दिसल्याची चर्चा होती. वन विभागाला तिथे बिबट्याचे ठसे आढळले होते. बुधवारी (ता. १९) सकाळी मात्र, सिंदोन गावच्या मालकी गटातील माळावर दोन गायी फाडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. 

उपसरपंच शेख वजीर शेख रहिमू यांच्या मालकीच्या या गायी होत्या. त्यांनी मंगळवारी रात्री आपली चार ते पाच जनावरे या माळावर चरण्यासाठी बांधली होती. बिबट्याच्या तावडीत त्यातल्या दोन गायी सापडल्या; पण इतर जनावरे मात्र दावे तोडून पळाल्यामुळे वाचली. गायींच्या नरडीजवळ फाडल्याच्या जखमा आणि दातांचे व्रण आढळून आले होते.

वनपाल एस. बी. चव्हाण, वनरक्षक गिरनेरा आणि वनमजूर साईनाथ नरोडे यांनी पंचनामा केला. त्यांना पडीक माळावर बिबट्याच्या पायांचे ठसे किंवा इतर खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे हा नक्की बिबट्याच होता का, याबद्दल साशंक असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, दोन गायींना फाडल्यामुळे हल्ला करणारे जनावर लहान नक्कीच नसावे, असा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे. 

हा बिबट्याचा अधिवास आहेच 

सातारा डोंगररांग बिबट्याचा अधिवास आहेच. याठिकाणी यापूर्वीही बिबट्याच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच सुखना परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने बिबट्याचा वावर असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांचे म्हणणे आहे. करमाड परिसरातील बिबट्याही या परिसरात फिरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रात्रीतून दहा ते बारा मैल अंतर कापणारा हा प्राणी कुणाच्या नजरेस न पडता पल्ला गाठतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT