छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत हुडहुडी, तापमान 8.1 अंशावर

शेखलाल शेख

औरंगाबाद : थंड वाऱ्यांनी शहर गारठले असून, शुक्रवारी (ता.17) शहरात या वर्षातील सर्वांत कमी 8.1 अंश सेल्सिअस इतक्‍या कमी तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी (ता.16) तापमान 15.5 अंश सेल्सिअस इतके होते.

थंड वारे वाहत असल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. 
या अगोदर 28 डिसेंबररोजी तापमान हे 10.9 अंश सेल्सिअस एवढे होते. आता 17 जानेवारी रोजी शहरात या वर्षातील सर्वांत कमी 8.1 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. थंड वाऱ्याने सर्वांना हुडहुडी भरल्याचे चित्र असून, दिवसाही गारवा झोंबत असल्याने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांपैकी बहुतांश नागरिक स्वेटर, जॅकेटमध्ये दिसत आहेत.

डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अपेक्षित अशी थंडी जाणवली नव्हती. मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी जाणवण्यास सुरवात झालेली आहे. थंडीचा परिणाम रात्रीच्या वेळी बाजारपेठेवर दिसत असून, रात्री बहुतांश ठिकाणी गर्दी कमी असते, तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटत आहेत. शिवाय सकाळी बाहेर पडताना धुक्‍यासोबत थंड वारे वाहत आहेत. 

पाच वर्षांतील शहरात जानेवारीत सर्वांत कमी 
नोंदविले गेलेले तापमान (कंसात तारीख) 

 

वर्ष तापमान 
2019 7.3 (30) 
2018 9.2 (25,26) 
2017 7.6 (11)
2016 8.4 (27) 
2015 7.9 (10)


थंडी नेमकी काय असते ? 

थंडी वाजते असे आपण म्हणतो; मात्र ही थंडी नेमकी काय असते याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, ""पृथ्वी नैसर्गिकरीत्या साडेतेवीस अंशांनी कललेली असून, तिचा अक्ष ऋतूनिर्मिती करीत असतो. ज्यावेळी सूर्याची किरणे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात विशेषत: महाराष्ट्र, भारताचा विचार केला तर ती तिरपी येतात. त्यामुळे भूपृष्ठावरील उष्णतेत आपोआप घट होत असते.

उष्णतेत घट झाल्याने हवेत असलेला गारवा आपोआप जाणवायला लागतो. थंडी जाणवायला लागते. त्यालाच हिवाळा म्हणतात. त्याशिवाय नैर्ऋत्य मॉन्सून उत्तरेकडे गेल्यानंतर तो पुन्हा परत जाताना सोबत शीतलहरी घेऊन जात असतो. त्यामुळे दख्खनच्या पठारावर चार महिने सातत्याने राहतात त्याचा परिणाम थंडी वाढण्यात होत असल्याचे ते म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT