Aurangabad News Media In The Country Has Become Underworld  
छत्रपती संभाजीनगर

देशात मीडियाच अंडरवर्ल्ड बनलाय : पत्रकार ऊर्मिलेश

अतुल पाटील

औरंगाबाद : एकेकाळी अंडरवर्ल्डचे डॉन फक्‍त मुंबईतच होते. आता देशभरातील मीडियाच अंडरवर्ल्ड बनला आहे. लोकांना पाहता येत नाही, ते अगदी नियोजनबद्ध टीव्हीवर दिसत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार ऊर्मिलेश यांनी व्यक्‍त केले. पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पटांगणात शनिवारी (ता. एक) "मूकनायक' शताब्दी महोत्सवात ते बोलत होते.

महात्मा फुले सामाजिक समता प्रतिष्ठानतर्फे तीनदिवसीय व्याख्यानमाला सुरू आहे. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प ऊर्मिलेश यांनी गुंफले. त्यांनी वर्तमान स्थिती में मीडिया का अस्तित्व एवं डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचार या विषयावर मत मांडले. अध्यक्षस्थानी कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे होत्या.

ऊर्मिलेश म्हणाले, बाबासाहेबांनी जेव्हा वृत्तपत्रे सुरू केली तेव्हा त्यावेळचे प्रेस काही लोकांनाच हिरो बनवत होते. लोकांना मात्र स्थान नसायचे. त्यावेळी किमान तीन-चार हिरो असायचे. आताचा कॉर्पोरेट टीव्हीवर फक्‍त एकच हिरो आहे. सीएए, एनपीआर, एनआरसीवरून देशात गदारोळ होत आहे. हिंदी मीडिया गदारोळ दाखवत आहे; पण कायदा काय हे सांगत नाही. ते काम इंग्रजी माध्यमे थोडेफार करीत आहेत.

सीएए हा नागरिकता काढून घेण्याचा नाही, तर देण्याचा कायदा असल्याचे सांगितले जाते. 370 कलमांबाबत बाबासाहेबांचे वक्‍तव्य चुकीच्या पद्धतीने पसरवले जात आहे. काश्‍मीरमुळे भारत-पाक संबंध खराब होत आहेत, ते सुधारले तर सुरक्षेवर इतका खर्च करण्याची वेळ येणार नाही. तो पैसा शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करता येईल, असे त्यांचे मत होते. मात्र, आताचे केंद्रातील सरकार त्यांच्या मताचा दुरुपयोग करत आहे. असे ऊर्मिलेश म्हणाले.

ऊर्मिलेश म्हणाले, सरकारी पातळीवर गेल्या सहा वर्षांत बाबासाहेबांची पुस्तके छापणे बंद केले होते. वेबसाईटवर असल्याचे कारण सांगितले जात होते. आवाज उठविल्यानंतर ती पुस्तके गेल्यावर्षीपासून छापायला सुरवात केली. संविधानावर हल्ले करून मनुस्मृती लागू करण्याचा सरकारचा डाव आहे. असा आरोपही त्यांनी केला. प्रास्ताविक शेखर मगर यांनी केले.

वाजपेयींना बहुमत नव्हते एवढेच
"वायपेयींचे सरकारही मोदी सरकारप्रमाणेच काम करीत होते. त्यांना बहुमत नव्हते एवढेच. त्यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद पाडली. नफ्यातील तेल कंपन्यांना घरघर लावली.'' असे सांगताना ऊर्मिलेश म्हणाले, लोकशाही आणि वर्णव्यवस्था एकावेळी चालू शकत नाही. यातील वर्णव्यवस्था संपवायला हवी. हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. देशातील मीडिया सध्या प्रोफेशनल नसून एकाच व्यक्‍तीच्या मागे घरंगळत चालला आहे.'' असा आसूड ऊर्मिलेश यांनी ओढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Boycott: विकासाच्या बदल्यात फसवणूक? नवी मुंबईतील २७ गावांचा निवडणूकीवर बहिष्कार, राजकारण्यांच्या आश्वासनांचा अखेर कंटाळा

PM मोदी ख्रिसमसनिमित्त गेले चर्चेमध्ये, प्रभू येशूसमोर केली प्रार्थना; पाहा Video

धक्कादायक! पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहितेनं घेतला गळफास; महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न, नवऱ्यानं असं काय केलं?

CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवण

Ichalkaranji Election : दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही; मात्र इचलकरंजीत अर्जांसाठी प्रचंड झुंबड

SCROLL FOR NEXT