Milk Producers Will Get One Rupee In Crease Per Liter
Milk Producers Will Get One Rupee In Crease Per Liter 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे एक रुपयाची वाढ

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघातर्फे दूध उत्पादकांना लिटर मागे एक रुपयाची वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता उत्पादकांना लिटरला तीस रुपये दर मिळेल. ही दरवाढ 21 जानेवारीपासून लागू करण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांनी  दिली.

जिल्ह्यातील मुख्य दूध पुरवठादार असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघातर्फे देवगिरी महानंद या ब्रॅण्डच्या माध्यमातून आपली उत्पादने बाजारत आणली आहेत. रोज सरासरी 75 हजार लिटरपेक्षा जास्त दुधाचे संकलन केले जाते. तर स्थानिक पातळीवर सरासरी 50 हजार लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. यासह ताक, लस्सी आदी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती व विक्री संघामार्फत केली जाते. जिल्ह्यातील समिारे 60 हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी संघाला नियमित दूध पुरवठा करतात. 

वाचा - या कारणांनी खालावत आहे शुक्राणूंची गुणवत्ता  

वीस दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ 

एक जानेवारीला संघाने खरेदी दरात लिटरमागे एक रुपयांची वाढ केली होती. तर बुधवारी संघाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष, आमदार बागडे यांनी खरेदी दरात पुन्हा एक रुपयाची वाढ करण्यात येत असल्याचे सांगितले. संघाचा दूध खरेदीदर प्रतिलिटर 29 रुपये होता. दरवाढीनंतर आता उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे 30 रुपये भाव मिळणार आहे.

ग्राहकांना  44 रुपये लिटर प्रमाणे विक्री

दरवाढ करताना विक्री दरात मात्र कोणतेही वाढ करण्यात आलेली नाही, असे संघाचे अध्यक्ष बागडे यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना पूर्वीप्रमाणे 44 रुपये लिटर या दरानेच दूध मिळणार आहे. याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, संचालक पुंडलिकराव काजे, राजेंद्र जैस्वाल, गोकुळसिंग राजपूत, कचरू डिके पाटील, व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.बी.पाटील उपस्थित होते. 
वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

गांधेलीतील प्रकल्पाचे सोमवारी उद्‌घाटन 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या गांधेली दुग्धशाळा विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाचे उद्‌घाटन सोमवारी (ता.27) रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT