औरंगाबाद : शहरात कोरोनाचा फैलाव सुरूच आहे. रोज नवनवीन वसाहतींमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाबाधित वसाहतींची संख्या ४०० वर गेली. गुरुवारी (ता. १८) शहरात ७० रुग्ण सापडले. महूनगर, लक्ष्मी कॉलनी, मध्यवर्ती कारागृह निवासस्थान, श्रीरामनगर, रामेश्वरनगर, श्रीविहान कॉलनी, शक्ती अपार्टमेंट या नवीन भागांत कोरोनाचा शिरकाव झाला.
शहरात आत्तापर्यंत ३१०६ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १,७०९ बाधित रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत, तर उर्वरित १,२३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी नव्या सात भागांत रुग्ण आढळले. तसेच खोकडपुरा, जयभवानीनगर, न्यू हनुमाननगरमध्ये रुग्ण वाढले आहेत.
हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान
आणखी एका अधिकाऱ्याला कोरोना
कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी काम करणाऱ्या महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. आतापर्यंत ११ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पुन्हा एका वॉर्ड अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे वॉर्ड कार्यालय तीन दिवसांसाठी बंद करण्यात आले असून, काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या या वॉर्ड कार्यालयात सुमारे २० कर्मचारी काम करत होते. ते वॉर्ड अधिकाऱ्याच्या संपर्कात आले असल्याने त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्यात लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांना सध्या होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रुग्णवाढीवर क्वारंटाइनची मात्रा
कोरोनाचे अनेकांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने शासन आदेशानुसार महापालिकेने होम क्वारंटाइनचे प्रमाण वाढविले होते; मात्र लॉकडाउन शिथिल होताच पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनवर भर देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार क्वारंटाइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पथके दहावर गेली आहेत. एका टीममध्ये दोन कर्मचारी आहेत. तीन आरोग्य केंद्रांसाठी एक टीम काम करणार आहे, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.