fraud
fraud 
छत्रपती संभाजीनगर

या गोष्टीसाठी दिले शिक्षिकेने बावीस लाख...पण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : संस्थेतील महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरीसाठी 22 लाख रुपये घेऊन वेतन न देता कायमही केले नाही. याप्रकरणी शिक्षिका मनीषा कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार संस्थेच्या अध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापक व एका अन्य शिक्षिकेविरुद्ध शनिवारी (ता. 18) सिडको

पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संस्थेचे अध्यक्ष जनार्दन म्हस्के, सचिव राहुल जनार्दन म्हस्के, प्रशासकीय अधिकारी तथा मुख्याध्यापक रतन आसाराम वाघ व एका अन्य शिक्षिकेविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली.

तक्रारीनुसार, मनीषा कुलकर्णी या समाजशास्त्र व हिंदी विषयात पदव्युत्तर असून एम.ए.,एम.एड.पर्यंत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्या नोकरीच्या शोधात होत्या. एका नातेवाइकाच्या माध्यमातून मनीषा कुलकर्णी यांची 2015 मध्ये नूतन बहुउददेशीय शिक्षण संस्था, सिडको, एन-11 या शाळेचे अध्यक्ष व इतर संशयितांशी ओळख झाली होती.

त्यावेळी संशयितांनी त्यांच्या महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाची जागा असल्याचे सांगितले; परंतु या पदावर नोकरीसाठी 22 लाखांची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार कुलकर्णी यांच्या आई-वडिलांसोबत संशयितांनी एन-11 येथील शाळेत व्यवहारासंदर्भात बोलणी केली.

त्यादरम्यान कुलकर्णी यांच्याकडून संशयितांना सुरवातीला दहा लाख रुपये देण्यात आले. त्यानंतर नियुक्तिपत्रासाठी साडेपाच लाखांची संशयितांनी मागणी केली. या पैशांचीही संशयितांना कुलकर्णी यांच्याकडून पूर्तता झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने धनादेश व रोखीने एकूण 22 लाखांची रक्कम देण्यात आली.

पण कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्याने कुलकर्णी यांनी डिसेंबर 2019 ला दिलेले पैसे संस्थाचालकाला परत मागितले. Nत्यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याने कुलकर्णी यांनी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.

बनावट कागदपत्रांद्वारे महाविद्यालयाला मान्यता

औरंगाबाद : महाविद्यालयाच्या प्रस्तावासोबत बनावट कागदपत्रे पाठवून शासनाकडून मंजुरी मिळवून घेत फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. 18) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, विश्‍वनाथ माधवराव तरटे व अन्य तीन महिलांचा गुन्ह्यात समावेश आहे. या प्रकरणात विकास मंडळ संस्थेच्या माजी सचिव महिलेने तक्रार दिली.

त्यानुसार तरटेंसह महिला आजीव सदस्यांनी पदाचा गैरवापर करून संत जनाबाई महिला विकास मंडळ औरंगाबाद या संस्थेद्वारे मॉडर्न न्यू कनिष्ठ महाविद्यालयाचा मंजुरी प्रस्ताव व त्यासोबत बनावट कागदपत्रे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मंत्रालयात सादर केली व महाविद्यालयाची परवानगी मिळविली. ही बाब उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT