000online ganda.jpg
000online ganda.jpg 
छत्रपती संभाजीनगर

दहा रुपये भरायचे सांगून हडपले ५० हजार ! औरंगाबादेत ज्येष्ठ महिलेला गंडविले.

मनोज साखरे

औरंगाबाद : पेटीएमचे केवायसी करण्याची थाप मारुन ज्येष्ठ महिलेला सुरुवातीला दहा रुपये ऑनलाईन भरायचे सांगितले, त्यानंतर सातवेळा ट्रान्जेक्शन करुन भामट्याने ५० हजार ६४४ रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, हेमलता श्रीकांत कुलकर्णी (वय ६२, रा. एन-४, सिडको) यांना ३० जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास भामट्याने मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी त्यांना पेटीएमच्या केवायसी विभागातून बोलत असल्याचे सांगत पेटीएम कार्यान्वित करण्याबाबत विचारले. तेव्हा कुलकर्णी यांनी ‘‘यापुर्वी पेटीएम सुरु करण्याचा प्रयत्न केला. पण पेटीएम सुरू होत नव्हते.’ असे सांगत त्यांनी भामट्याला पेटीएम सुरु करण्यासंदर्भात सांगितले. पेटीएम सुरु करण्यासाठी सुरुवातीला दहा रुपये खात्यात भरावे लागतील असेही म्हणाला. यावर विश्‍वास ठेवत हेमलता कुलकर्णी यांनी भामट्याने सांगितल्यानुसार पेटीएमची प्रक्रिया सुरु केली. प्रक्रिया पार पाडत असतानाच कुलकर्णी यांच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक आला. हा ओटीपी क्रमांक त्यांनी पेटीएमव्दारे दहा रुपये भरण्यासाठी अ‍ॅप्लीकेशन मध्ये टाकला.

त्याचवेळी त्यांच्या खात्यातून सात हजार ५९९ रुपये कपात झाले. हा संदेश मोबाईलवर आल्यावर कुलकर्णी यांनी भामट्याशी संपर्क साधत विचारणा केली. त्यावर त्याने तुमचे पैसे डेबीट झालेले नाहीत असे सांगितले. मात्र, फसवणुक झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी बचत खाते बंद करण्यासाठी व त्यावरून होणारे व्यवहार थांबवण्यासाठी सिडकोतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेशी मोबाईलवरुन संपर्क साधला. यादरम्यान त्यांच्या खात्यातून सहावेळा प्रत्येकी सात हजार ५९९ रुपये व एकवेळ पाच हजार ५० रुपये कपात झाल्याचे संदेश मोबाईलवर आला. याप्रकारानंतर ३१ जुलैला त्यांनी बँकेत जाऊन खात्याचे सर्व व्यवहार तपासले. तेव्हाही पन्नास हजार ६४४ रुपये खात्यात कमी होते. यामुळे त्यांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

(Edited By Pratap Awachar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT