प्रियकर.jpg 
छत्रपती संभाजीनगर

प्रेमापोटी 'ती' घरदार सोडून आली; पण प्रियकरानेच धूम ठोकली! 

सुषेन जाधव

औरंगाबाद  : ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या उक्तीनुसार तिने घरदार सोडले अन् कोलकात्यावरून औरंगाबादेत दाखल झाली ती थेट गॅरेजवर! पण नेमके तिला पाहून प्रियकरानेच धूम ठोकल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. सोशल मीडियावरून दोघांची ओळख झाल्यानंतर एक दिवस त्याच्या भेटीची आस लागलेल्या प्रेयसीने आईवडील, घरदार सोडून शहरात आली. मात्र ऐनवेळी प्रियकर गायब झाल्याने व ती अल्पवयीन असल्याने शेवटी पोलिसांच्या मदतीने तिला आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
यासंदर्भात पुंडलिकनगर पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील पुंडलिकनगर परिसरात गॅरेजवर काम करणाऱ्या विशीतल्या तरुणाची कोलकात्याच्या आणिपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीसोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीनंतर त्यांचे दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेत कॉलवर तासनतास गप्पा केल्या. प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणीने मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही, तुला भेटायला औरंगाबादेत येते, दोघे लग्न करून सोबत राहू, असे सांगितले. तरुणानेही तिला होकार देत शहरात येण्यास सांगितले.

भल्या पहाटे सोडले घरदार 
तरुणासोबत बोलणे झाल्यानंतर त्याच्या भेटीसाठी आतुर झालेल्या तरुणीने १९ नोव्हेंबरच्या पहाटे घर सोडले. ती २० नोव्हेंबरच्या रात्री कोलकात्यावरून औरंगाबादेत पोचली. रिक्षात बसून ती थेट त्या तरुणाच्या गॅरेजवर पोचली. 

तिला पाहताच त्याने ठोकली धूम! 
आपल्याला तासनतास बोललेली मुलगी प्रत्यक्ष गॅरेजवर पोचल्याचे पाहताच भांबावलेल्या तरुणाने धूम ठोकली. तो क्षणात गायब झाला. गॅरेजमालकाने सर्व प्रकार पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) घनश्याम सोनवणे यांना सांगितला. एपीआय सोनवणे यांनी मुलीकडून तिच्या वडिलांचा नंबर मिळवून त्यांना मुलगी ही औरंगाबादेत आल्याची माहिती दिली. 
 देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पैशांसह सोनेही तिने आणले होते  
प्रेमापोटी घरदार सोडलेली तरुणी ही कोलकात्यातील मोठ्या उद्योजकाची मुलगी आहे. तिने घर सोडण्यापूर्वी दहा लाख रोख आणि सोन्याचे दागिने सोबत आणल्याचेही पोलिसांनी सांगितले. तरुणीने पोलिसांना सांगितले की, आपण लग्न करण्यासंदर्भातील कल्पना प्रियकराला दिली होती, लग्न करून औरंगाबादेत त्याच्या सोबत राहण्यासाठी घर सोडल्याचेही ती पोलिसांना म्हणाली. मात्र ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिच्या आईवडिलांना शहरात बोलवून घेतले होते. विमानाने आलेल्या तिच्या आईवडिलांनी गॅरेजमालक आणि पोलिसांचे आभार मानले व मुलीला सोबत घेऊन ते विमानाने कोलकात्याला परत गेले. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT