Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

परप्रांतीय गेले, आता तरी भूमिपुत्रांना संधी द्या - सुभाष देसाई

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : राज्यात आतापर्यंत ६४ हजार ४९३ उद्योगांना परवानगी देण्यात आली असून, मराठवाड्यात ५ हजार ८२२ कारखाने सुरू झाल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (ता. १३) येथे पत्रकार परिषदेत दिली. नवगुंतवणूकदारांना फक्त एकच महापरवाना लागेल. सध्या परप्रांतीय कामगार राज्यातून गेले आहेत. त्यामुळे नोकरीच्या अनेक संधी आहेत. आता मराठी माणसांची बेरोजगारी दूर करण्यासाठी त्या जागेवर भूमिपुत्रांना संधी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

श्री. देसाई यांच्या उपस्थितीत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, लोकप्रतिनिधींसोबत बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी मोठे पॅकेज जाहीर केले आहे. कोणत्या विभागासाठी किती? हे अजून येणे बाकी आहे. इतर देशांतून आपल्याकडे काही उद्योग येऊ पाहत आहेत.

याबाबत आमच्या विभागाशी ते संपर्क साधत आहेत. हे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आल्यानंतर सविस्तर सांगता येईल. नवगुंतवणूकदारांना फक्त एकच महापरवाना लागेल. तो तत्काळ दिला जाईल. एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करणार असून मराठवाड्यात ५ हजार ८२२ कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. विजेचा जेवढा वापर तेवढेच शुल्क आकारले जाईल. 

भूमिपुत्रांसाठी आजपर्यंत आपण लढत होतो. आता परिस्थितीनेच आपल्याला संधी आणली आहे. दरवर्षी १० लाख मुले-मुली पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. देशात सर्वांत जास्त सवलती आपल्या राज्यात आहेत. उद्योजकांनीदेखील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी द्यायला हवी. या माध्यमातून मराठी माणसांची बेरोजगारी दूर होईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेकडून ४ हजार खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

मृत १६ मजुरांच्या मालकांशी बोलणार 
रेल्वे दुर्घटनेत चिरडले गेलेले १६ मजूर ज्या कंपनीत काम करीत होते, त्या मालकांची चौकशी होईलच; मात्र त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची बाकी असलेले पैसे याचीही माहिती घेतली जाणार आहे. शिवाय, त्यांच्याकडून अजून काय मदत करता येईल, याबद्दल देखील त्यांच्याशी बोलणार आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मदत मिळणारच, अशी ग्वाहीही श्री. देसाई यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT