Dalinbh pachod.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अन् त्यांनी अडीच एकरातल्या डाळींबावर जेसीबी फिरवला, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याची ह्र्दयद्रावक कहाणी. 

हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद) : मोसंबीनंतर घराला घरपण व चारचौघांत मोठेपण देणाऱ्या डाळींबावर पडलेल्या जीवाणूजन्य करपा (तेल्या) रोगामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले गेले. फळे परिपक्व होऊन विक्रीच्या बेतात असतानाच संततधार पाऊस व "तेल्या" रोगाने बागेला ग्रासले. खर्च निघण्याची शाश्वती न राहिल्याने मुरमा (ता. पैठण) येथील शेतकऱ्याने डाळिंबांची सहाशे झाडे जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकली. 

पैठण तालुक्यात मोसंबीचे साडेआठ हजार तर डाळींबाचे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मोसंबी, डाळींब व ऊस ही तालुक्यातील महत्वाची व नगदी पैसा देणारे पिक म्हणून ओळखले जातात. यंदा मोसंबीला कोरोनाच्या पार्श्वभूमी भूमीवर लॉक डाऊनचा फटका बसल्याने भाव कोसळले त्यामुळे मोसंबी उत्पादक पुर्णत: कोमेजला गेला. तर ऐन डाळिंबाच्या बागा फळ उतरविण्याच्या वेळीच परिसरात संततधार पाऊस होऊन त्यावर करपा व तेल्या रोगाचा प्रार्दूभाव झाला. डाळींबाचे दर कमालीचे कोसळले. व्यापाऱ्यांनी बागा खरेदीकडे कानाडोळा केला. बागेच्या जोपासनेवर झालेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यानी झाडांवरील फळे तोडून बांधावर टाकली. डाळींब उत्पादकाचे आर्थिक गणित विस्कटले गेले. 

डाळीबावर आलेल्या संकटामुळे खचून मुरमा (ता.पैठण) येथील शेतकरी महेश ज्ञानेश्वर लेंभे यानी आठ वर्षीपूर्वी लागवड केलेली एक हेक्टर क्षेत्रातील सहाशे झाडे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. या वर्षी बागेवर झालेल्या दीड लाख रुपये खर्चाची पर्वा न करता डाळींबाची बाग जिवंत ठेवली. मात्र बागेतील ७० ते ८० टक्के डाळिंब तेल्या रोगांमुळे खराब झाले. यंदा या बागेतून त्यांना चांगले उत्पादन मिळण्याचे स्वप्न धूसर बनले. सर्व बागेवर तेल्याचा प्रार्दुभाव झाल्याने फळे डागाळलेले गेले.

कॅरेट भरभरून डाळींब फेकून द्यावे लागले. तर काही कॅरेट बाजारात विक्रीस नेले असता त्यास कवडीमोलही भाव मिळ‌ाला नाही. त्यामूळे महेश लेंभे यांनी डाळिंबाची बाग तोडण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण डाळीबाच्या बागेवर जेसीबी फिरवून संपूर्ण झाडे उपटून फेकली. यावेळी बाग तोडताना या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे दिसून आले. शासनाने डाळींब उत्पादकांचा शंभर टक्के फळपीकविमा मंजुर करुन दिलासा दयावा अशी मागणी महेश लेंभे यांनी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT