man ki bat modi.gif 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : गाडीवाट जिप शाऴेची पंतप्रधानांनी घेतली दखल; 'मन की बात' मध्ये साधणार संवाद 

प्रताप अवचार

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाडीवाट जिल्हा परिषद या शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या मदतीने जापनीज भाषा शिकत आहेत. विदेशी भाषा शिकवणारी महाराष्ट्रातली ही पहिली शासकीय शाळा आहे.

या शाळेच्या कामाची दखल पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे. 'मन की बात अपडेट्स' या ट्वीटर हँडलवरुन या शाळेबद्दल ट्वीट करण्यात आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या जिल्हा परिषदेचे नाव आता देशभर पसरले आहे. जिल्ह्यातील जपानी भाषा शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांचं आता 'मन की बात' मध्ये कौतुक होणार आहे.

लॉकडाउनच्या कालावधीत व्यवहार ठप्प झाले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिकणे थांबले नाही. तर ते अधिक गतीने होत असल्याचे गाडीवाट व वरवंडी तांडा येथील शाऴेच्या माध्यातून दिसून येत आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउन काळात शिक्षण विभाग अनेक सर्जनशील प्रयोग होत आहेत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री नामदार संदीपानजी भुमरे यांनी नुकतीच केली होती.

औरंगाबाद पासून पंचवीस कि. मी. दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शासनाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमासोबतच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जापनीज भाषा शिकत आहेत. तसेच विषय मित्र व पालक मित्रांच्या मदतीने भौगोलिक क्षेत्रानुसार केलेल्या गटातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.

विद्यार्थ्यांचे होणार कौतुक 
औरंगाबाद पासून 25 किलोमीटर दूर असलेल्या गाडीवाट येथील जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून जपानी भाषा शिकत आहेत. चांगल्या पद्घधतीने उत्तम संवाद देखील साधत आहेत. पंतप्रधान मोदी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमात या शाळेचं, विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं कौतुक करणार आहे. 

शासनाकडून सहकार्य मिळेल- गोंदावले
पैठण तालुक्यातील वरवंडी तांडा येथील विद्यार्थ्यांनी आव्हान स्वीकारून आपला वर्षभराचा अभ्यासक्रम शाळा बंद असतानाही 3 महिन्यात पूर्ण केला. आता पुढील काळात हे विद्यार्थी जर्मनी भाषेसोबतच अभ्यासक्रमा बाहेरील इतर अनेक गोष्टी शिकणार आहेत. वरवंडी तांडा येथील चार ग्रामस्थांनी आपली स्वतःची जमीन शाळेसाठी दान दिली आहे. गावाच्या नावात जरी गाडीवाट असलं तरी या मुलांनी निवडलेला मार्ग त्यांना निश्चितच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल यात काही शंका नाही. दोन्ही शाळांना प्रशासन व शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळत राहील याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रवाशाने VIDEO केला म्हणून वाचला TTE, तिकीट मागताच तरुणीने स्वत:चे कपडे फाडले; धावत्या ट्रेनमध्ये घातला गोंधळ

‘आधी स्वतःकडे पाहा!’ कतरिनाच्या वाढलेल्या वजनाच्या ट्रोलिंगवर अली जाफरचा संतापला, म्हणाला...

IND W vs BAN W: भारताने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; बांगलादेशविरुद्ध सेमीफायनलसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing XI

Sardesai Wada in Kasba : छत्रपती संभाजी महाराजांचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक वाडा पडझडीच्या मार्गावर; मुख्यमंत्र्यांकडे संवर्धनासाठी आर्त हाक

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा नवा फॉर्म्युला! 25 नाही तर तब्बल 'इतक्या' जागांसाठी होणार चुरस, काय आहे गणित?

SCROLL FOR NEXT