Police have appealed for lane discipline on the railway bridge on Aurangabad Waluj Road 2.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-वाळूज रस्त्यावरील रेल्वे पुलावर लेनची शिस्त पाळा ; उद्योग संघटना, पोलिसांचे आवाहन

प्रकाश बनकर

औरंगाबाद : औरंगाबाद - एमआयाडीसी वाळूजची जीवन वाहिनी मानल्या जाणारे रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलावर रोज सकाळी दोन आणि सायंकाळी दोन असे चार तास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. याचा परिणाम थेट औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या कामगारावर होत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करीत वाहनधारकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बुधवारी औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी आणि पोलिसांनी थेट रस्त्यावर उतरत जनजागृती केली. आणि ही कोंडी सोडविण्यासाठी नियमावली (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली, असल्याचे सीआयआयचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले.

औद्योगिक संघटनांनी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट घेत हा प्रश्‍न सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यासह औद्योगिक संघटनाही पोलिसासह रोडवर उतरत वाहनधारकांना वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. समांतर रेल्वे पुलाचे काम लवकरात-लवकर कसे पूर्ण होईल. याकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देत हा प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावेत, अशी मागणीही या औद्योगिक संघटनांनी केली आहे. मसिआचे अध्यक्ष अभय हंचनाळ, सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धुत, उपाध्यक्ष, शिवप्रकाश जाजू, सचिव सतीश लोणीकर, बिमटा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद थोरात, मसिआचे सचिव राहूल मोगले, सुमीत मालणी, दिलीप गागुर्डे उपस्थित होते.

- औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकारी शहरातून वाळूजकडे जाताना लेनचा डिसीप्लेन पाळावा.
- यासह कंपन्यांनी सायंकाळी ६ ते ८ या वेळीत शहराकडे परत येणाऱ्या कामगारांच्या वेगवेगळया वेळात जातील असे नियोजन करावेत.
- प्रत्येक कंपनीच्या प्रशासनाने आपल्या कामगारानी अधिकाऱ्यांनी या सूचना घेण्यात यावेत.
- प्रत्येक कर्मचाऱ्यांनी यासह सर्वसामान्य वाहनधारकांनी लेनचा शिस्तीत वापर करावा.
- शहरात जाण्यासाठी कंपन्यांच्या बसेसनी ए.एस कल्बमार्गे पैठण रोड, सुतगिरीणी, उस्मानपुराचा हा पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- ट्रन्स्पोर्टचालकांनी त्यांच्या वाहनधारकास या रेल्वे पुलावरुन जाताना लेनच्या शिस्त पाळावीत. डबल ओव्हरटेक करु नयेत.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT