Navnath idhate.jpg 
छत्रपती संभाजीनगर

दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्रियशरण महाराज जखमी!

नवनाथ इधाटे

फुलंब्री (औरंगाबाद) : चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात प्रियशरण महाराज यांच्यावर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केल्याने महाराज जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रियशरण महाराज हे मुळचे राजस्थान येथील आहेत. गेल्या काही वर्षा पासून त्यांनी या परिसरात आश्रम सुरु केला आहे. याशिवाय येथे गो-शाळाही ते चालवितात. त्यांच्या आश्रमात महिला व पुरुष असे सेवक आहेत. आश्रमानजीक शेती आहे. येथे काम करणारे त्यांचे अनुयायी राहतात. त्यांचा जास्त वेळ बाहेर गावी सत्संग करण्यात जातो. चौक्यापासून तीन किमीवर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियशरण महाराज यांचा आश्रम आहे. 

मंगळवारी मध्यरात्री अज्ञात सात ते आठ दरोडेखोर आले. त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या खोलीत एक महिला झोपली होती, तिला धमकावले. महाराज कुठे आहे म्हणून विचारणा केली, तिने महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिली असता त्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन महाराज यांना मारहाण केली. यात महाराज व अज्ञात लोकांमध्ये झटापट झाली. यात प्रियशरण महाराज जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व गुन्हा दाखल केला. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: बुलेट ट्रेनच्या मार्गाला आता विजेची गती, सुरत-बिलिमोरामध्ये ओव्हरहेड वायर सुरू

Chandoli Wildlife Tourism Project : 'सेनापती', 'चंदा'पाठोपाठ आता मगरींचेही आकर्षण; चांदोली अभयारण्यात 'नाईट सफारी' अन् क्रोकोडाईल पार्कची चर्चा, नेमका काय आहे प्लॅन?

Marathi News Live Updates : ...अखेर गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश; आमदार शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, महसूल विभागाचा निर्णय

कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं! एक खेळाडू, एक सामना अन् अचंबित करणारा वर्ल्ड रेकॉर्ड...

Maharashtra Drought List : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; महसूल मंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT