Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

खरोखर प्रेरणादायक! आईचं छत्र हरवलेली पूजा झाली फौजदार

सुनील पांढरे

अंधारी (औरंगाबाद) : कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक कमावायला, यश संपादन करायला परिस्थिती आड येता कामा नये, हे ब्रीद अनेकांकडून ऐकले. परंतु ते सत्यात उतरावयला जी कसरत करावी लागते, त्यामागचा त्याग खूप मोठा असतो. अशाच प्रकारे तीन वर्षापूर्वी आईचे छत्र हरवलेल्या पूजाने मेहनत, चिकाटीच्या जोरावर भरारी मारत पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण केले. 

सिल्लोड तालुक्यातील दीडगावच्या पूजा किसन पांढरे हिची आई तीन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन पावली. तिने हे दुःख पचवत वडील, भाऊ, काका, काकू आदी मंडऴीच्या मदतीने अभ्यास करीत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण करीत अभिनंदनास पात्र ठरली. पूजाचे प्राथमिक शिक्षण दीडगाव जिल्हा परिषद शाळेत, तर तर पुढे १२वीपर्यंतचे शिक्षण भराडी येथील सरस्वती भुवन, तर पदवीचे शिक्षण सिल्लोड येथील यशवंत महाविद्यालयात झाले. स्पर्धा परिक्षेची तयारी करताना दादाराव गोराडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. 

तिचे वडील किसन हे शेतकरी आहेत. अल्प शेती, त्यात निसर्गाची साथ नाही, शेती पिकली तरी भाव नाही अशा आर्थिक खडतर स्थितीतही वडिलांनी  व मामांनी शिक्षणाची उमेद तिच्यात निर्माणच केली नाही तर, सगळे बळ एकवटून तिच्या पाठीशी उभे राहिले. तीन वर्षांपूर्वी तिच्या आईचे छत्र हरवले. घरची जबाबदारी व अभ्यास अशी कसरत करत जिद्दीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून हे घवघवीत यश संपादन केले  आज हे यश पाहायला आई असायला हवी होती, हे सांगताना तिचा कंठ दाटून आला. 

सखाहारी दत्ता तायडेचीही निवड 

भराडी येथून जवळच असलेल्या सावखेडा बुद्रुक येथील सखाहारी दत्ता तायडे यानेही सतत चार वर्ष अभ्यास करीत या परीक्षेत यश मिळविले. सखाहारीचे प्राथमिक शिक्षण सावखेडा येथे जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिकचे देऊळगाव बाजार येथील महर्षि विट्ठल रामजी शिंदे विद्यालयात, तर उच्च माध्यमिक व पदवीचे शिक्षण सिल्लोड येथील यशवंत विद्यालयात झाले. या यशाबदद्ल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT