crime.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांचा काळाबाजार ! तरुण पिढी होतेय बरबाद !  

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : औरगाबाद शहरात निद्रानाश गोळ्यांचा वापर आता नशा करण्यासाठी केला जाऊ लागला आहे. यामुळे शहरातील तरुण पिढी बरबाद होऊ लागली आहे.आरोग्यास धोकादायक असलेल्या निट्रोसन-१० या निद्रानाश रुग्णांसाठीच्या गोळ्यांचा काळाबाजारात विक्री करणाऱ्या व्यक्तीला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून ७५ हजार रुपयांच्या निट्रोसन-१० गोळ्यांचे पंधरा बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.  

मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन जवळ एक व्यक्ती निट्रोसन-१० या निद्रानाश रुग्णांसाठी असलेल्या गोळ्या नशा करण्यासाठी विक्री करीत असल्याची माहिती पुंडलीक नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (ता.२९) रात्री दहा वाजेच्या सुमारास औषध निरिक्षक राजगोपाल बजाज व दोन शासकीय पंचांना सोबत घेऊन छापा मारला. पोलिसांनी मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन येथील देशी दारुच्या दुकानाच्या आडोशाला उभ्या असलेल्या संशयित आरोपी आवेज खान जावेद खान (वय २०, रा. बायजीपुरा) याला अटक केली.

त्याच्या ताब्यातून निट्रोसन-१० गोळ्यांचा दिड हजार गोळ्यांच्या पंधरा बॉक्सचा साठा जप्त केला. ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहाय्यक आयुक्त रविंद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक घनशाम सोनवणे, उपनिरिक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, जालिंदर मान्टे, रवि जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, दीपक जाधव, विलास डोईफोडे, माया उगले यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

तरुण पिढी उद्धवस्त..! 
मुकूंदवाडी रेल्वेस्टेशनच्या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार, मजूरांच्या वसाहती आहेत. त्यामुळे या भागात या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकाराने तरुण पिढी उद्धवस्थ होत असल्याने या कारवाईला महत्व आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT