devdhuth.jpg 
छत्रपती संभाजीनगर

प्रियंकाची पोटासाठी भटकंती सुरु होती, त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. अखेर तिच्यासाठी आरोग्यसेविका बनल्या देवदूत

जमील पठाण

कायगाव (औरंगाबाद) : मासेमारीच्या शोधात भटकंती करीत कायगाव (ता. गंगापूर) परिसरातील गोदावरी नदी काठी आलेल्या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने तिच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आरोग्य पथक देवदूत बनून काही क्षणात दाखल झाले. त्या आदीवासी महिलेचे यशस्वी बाळंतपण करून आई अन् बाळाचे प्राण वाचविले. आरोग्य पथकाच्या कर्तव्यदक्ष कामगिरीचे परिसरात कौतुक होऊ लागले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, कायगाव-अमळनेर शिवारातील गंगापूर वॉटर सप्लाय जवळ गोदावरी नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी जालना जिल्ह्यातील सांवगी तलाव येथील दांपत्य एक वर्षापासून गोदाकाठी वास्तव्यास आहे. प्रियंका दिनेश भंडारे (25) पती दिनेश भंडारे या दाम्पत्याला एक पाच वर्षांची मुलगी, एक दोन वर्षांची मुलगी आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी दिनेश यांना प्रियंका मासेमारी करण्यासाठी मदत करतात. 

गुरुवारी (ता.3) सकाळी 11 वाजता प्रियंका यांची प्रकृती खराब झाली. तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. दवाखान्यात नेण्यास वेळ कमी होता. अशात तिला प्रसूतीचा त्रास सुरू झाला. तेथील स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत आरोग्य कर्मचारी यांना माहिती दिली. तात्काळ  प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडाला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत नरवडे यांनी आरोग्य सेविका सुनंदा इंगळे, आशा सेविका आशा साळवे, रोसा ब्राम्हणे यांना त्या ठिकाणी पाठवून महिलेला औषधी उपचार करून सलाईन दिले. काही वेळानंतर त्या महिलेने एका तीन किलो वजनाच्या गोंडस बाळाला जन्मदिला. बाळ बाऴंतीण दोघेही सुखरूप आहेत. 

आरोग्यसेविकांनी बनविले जेवण 
आरोग्य सेविका सुनंदा इंगळे, आशासेविका आशा साळवे, रोसा ब्राम्हणे यांनी त्या गर्भवती महिलेच्या सुखद बाळंतपणासाठी मदत केली. त्यानंतर घरात दुसरे कोणीही नसल्याने आरोग्यसेविकांनीच चुलीवर स्वयंपाक बनवून तिला खावू घातले. घरात नवीन बाळाचे स्वागत झाल्याने सर्वांनाच आनंद झाला. आरोग्य विभागाच्या या दुर्गांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीनंतर सोन्याचे भाव कोसळले! मार्च महिन्यात सोनं तब्बल 35 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Panchang 23 March 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT