Sugarcane And Aurangabad News
Sugarcane And Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

मुलाप्रमाणे जपलेला १७ एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याला अश्रू अनावर

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद ) : एकीकडे ऊसाला तोड मिळत नसल्याने तर दुसरीकडे ऊस कामगार टोळ्या यंत्रणेच्या आर्थिक पिळवणूकीने उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. पैठण तालुक्यातील लोहगाव शिवारात रखरखत्या उन्हाच्या चटक्यात वीजतारा तुटल्याने भंयकर आग भडकून बारा शेतकऱ्यांचा जवळपास सतरा एकरातील आठशे टन ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवारी (ता.तीन) अकराच्या दरम्यान घडली. तीन गावांतील नागरिकांनी धावाधाव करून आजुबाजूचा पन्नास एकर क्षेत्रातील ऊस आगीपासून वाचवला आहे. याबाबतची अधिक माहिती, अशी की लामगव्हाण येथील ऊस (Sugarcane) उत्पादक भागचंद गवंदे, ऋषिकेश शेलुटे यांच्या लोहगाव शिवारातील गट नंबर १९६ मधील चार एकर ऊस पीक तोडणी सुरू असताना कडक उन्हात अचानक विद्युत खांबाजवळ वीजतारेचे घर्षण होऊन तारा तुटून आग लागली असताना शेजारील गट नंबर १९७ मधील शिवनाथ शिंदे, ताराबाई कदम, हरिचंद्र शिंदे, गोरख शिंदे, बाबासाहेब शिंदे, कैलास शिंदे, गोपीनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, सुभाष शिंदे यांच्या तेरा एकरातील ऊसाला एकाच वेळी आग लागुन ऊस उत्पादकाचा आठशे टनापेक्षा जास्त ऊस जळून खाक झाला आहे. (Seventeen Acre Sugarcane Burned In Lohgaon Of Aurangabad)

ही बातमी लोहगाव, लामगव्हाण, मावसगव्हाण गावात भ्रमनध्वनी व मंदिरातील लाउडस्पीकरद्वारे उद्घोषित होताच असंख्य तरूण शेतकऱ्यांनी (Farmer) रणरणत्या उन्हात धाव घेत रौद्ररूप धारण केलेल्या क्षेत्राच्या चारही बाजूचे ऊसाच मोठे क्षेत्र आगीपासून वाचवले आहे. दरम्यान सतरा ते अठरा महिन्यांचा ऊस होऊनही साखर कारखाना पदाधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी, आमदार, मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांच्या दुर्लक्षाने ऊसतोड कामगार, वाहन चालकांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. एकरी पंधरा हजार रूपये दिल्याशिवाय तोड होत नसल्याने ऊस उत्पादक हतबल झाले आहेत. या बाबींकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन परिस्थिती नियंत्रणात आणून आगीत नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (Aurangabad)

पिक डोळ्यांदेखत जळून गेल्याने शेतकऱ्याने फोडला टाहो

महावितरणच्या (Mahavitaran) शेतीपंप, रोहित्राला, विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा देखभाल दुरुस्ती अभावी व जीर्ण झालेल्या तारा वारंवार तुटुन शेतकऱ्यांचे नुकसान होते. याकडे महावितरण कंपनी लक्ष देत नाही. त्यामुळे वर्षभर रात्रीचा दिवस करून लेकराप्रमाणे जपलेल पीक डोळ्यांदेखत जळून गेल्याने भागचंद शिंदे यांनी अश्रूचा टाहो फोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT