shivsena political News 
छत्रपती संभाजीनगर

शिंदे गटात येण्यासाठी तब्बल 50 कोटींची ऑफर, सेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

राजपूत यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

राजपूत यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा

शिंदे गटात सामिल होण्यासाठी ५० कोटींहून अधिकची ऑफर दिली असल्याचा गौफ्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांनी केला आहे. याशिवाय दोन चारचाकी वरुन फुटेज असल्याचा दावा आमदार राजपूत यांनी केला आहे. १०० कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (maharashtra politics) ते औरंगाबादचे कन्नडचे आमदार आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या विरोधातील बंडाला नवे वळण मिळणार असल्याची चर्चा आहे. (shivsena political News)

शिवसेनेतून बंडखोरी करण्यासाठी ५० कोटीहून अधिकची ऑफर होती, असा दाना त्यांनी केला आहे. या ऑफरसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याहून अधिकची ऑफर होती. याबाबत माझ्याकडे दोन चारचाकी भरुन पैसे आल्याचे फुटेजही असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मी गद्दारी केली आहे. १०० कोटी दिले असते तरी मी गद्दारी केली नसती असंही ते म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांच्याबाबत कोणतीही गद्दारी करणार नाही. मला ऑफर होती मात्र मी गद्दारी केली नाही असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले आहे. शिंदे गटातील नेत्यांना आता केंद्रानेही सुरक्षा पुरवली आहे. राज्यपाल कोश्यारी यांना आता डिस्चार्ज मिळल्याने सर्व यंत्रणा आता हालणार असल्याची चर्चा आहे. आता केंद्रासह या आमदारांच्या सुरक्षेसाठी राज्यपालांनीही एक पत्र मुंबई पोलिसांना लिहले आहे. त्यामुळे हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT