court_7_0.jpg 
छत्रपती संभाजीनगर

शिर्डीतून बेपत्ता होणाऱ्य़ा लोकांच्या शोधासाठी विशेष पथक नेमा, खंडपीठाचे पोलिस महासंचालकांना आदेश.  

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : शिर्डीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमून योग्य ती पावले उचलावीत, असा आदेश न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी पोलिस महासंचालकांना दिला आहे.

यामध्ये मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, यासंदर्भातही तपास करावा, असे आदेशात म्हटले आहे. याचिकेवर २४ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. या संदर्भात इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी त्यांची पत्नी शिर्डीतून बेपत्ता झाल्यासंदर्भात खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका सादर केली आहे.

इंदूर येथील रहिवासी मनोजकुमार सोनी यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉर्पस याचिका सादर केली आहे. याचिकेनुसार, ऑगस्ट २०१७ मध्ये ते पत्नी आणि दोन मुलांसह शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर प्रसादालयापासून त्यांची पत्नी बेपता झाली. बराच शोध घेतल्यानंतर त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पत्नीच्या तपासाबाबत त्यांनी पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा, चौकशी केली; परंतु त्यांना दाद देण्यात आली नाही.

प्रसादालयाजवळचे सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळले. त्यांनी माहितीच्या अधिकारात शिर्डीतून अशा प्रकारे बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागविली असता, जानेवारी ते ऑक्टोबर २०१७ या कालावधीतच ३० पेक्षा जास्त व्यक्ती बेपत्ता असल्याचे आढळले. यासंदर्भात खंडपीठात वेळोवेळी झालेल्या सुनावणीत नगर येथील पोलिस अधीक्षकांना पाचारण करण्यात येऊन यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अधीक्षकांनी खंडपीठात अहवाल सादर केला. मात्र तो अहवाल समाधानकारक नसल्याचे मत व्यक्त करीत खंडपीठाने पोलिस महासंचालकांना वरील आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुशांत दीक्षित तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. के. एस. पाटील काम पाहत आहेत. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : दौंड–इंदापूरमध्ये बनावट मद्याचा भंडाफोड; तीन लाखांचा साठा जप्त; तीन तरुणांना अटक!

Latest Marathi News Update LIVE : ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाचा वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा

Sangli News: नाराजांसह बंडाची तयारी करणाऱ्यांची मनधरणी सुरु; ‘पॅचअप’साठी बैठकांचे सत्र; अनेक नाराजांकडून पक्षांतराची घोषणा

Balapur Crime : तुरीच्या शेतात धक्कादायक घटना: जळालेल्या अवस्थेत युवतीचा मृतदेह सापडताच परिसरात खळबळ!

Ichalkaranji News: इच्छुकांची धाकधूक वाढली; महापालिका निवडणुकीची अनिश्‍चितता, हालचालींना ब्रेक

SCROLL FOR NEXT