RAM BHOGLE 
छत्रपती संभाजीनगर

सामाजिक अस्वस्थता टाळण्यासाठी काही प्रमाणात उद्योग सुरू करा-राम भोगले

प्रकाश बनकर

औरंगाबाद: गेली एकवीस दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण उद्योग बंद ठेवत, कोविड-१९च्या साथीला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. केंद्र व राज्य सरकारकडे उपलब्ध असलेली संसाधने हे उद्योगावर अवलंबून आहेत. येणाऱ्या काळात सामाजिक अस्वस्थता वाढेल, ही टाळण्यासाठी काही प्रमाणात उद्योग सुरू करता येऊ शकतात, असे मत उद्योजक राम भोगले यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले. 

श्री. भोगले म्हणाले, की येणाऱ्या काळात उद्योग सुरू झाला नाही, तर केंद्र व राज्य सरकारची या संकटाशी सामना करण्याची आर्थिक क्षमता कमी होईल. आरोग्याची काळजी घेत, कर्मचाऱ्यांना सर्व सुरक्षा साधने पुरवित सोशल डिस्टन्स पाळत उद्योग सुरू होऊ शकतो.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सध्याची परिस्थिती भयावह आहे. ती अशीच राहिली तर पुढे उद्योग सुरू करायचा म्हटला तर खेळत्या भांडवलात आलेली तूट आणि मनुष्यबळ इतरत्र गेल्यामुळे उद्योग पुन्हा उभा करणे अवघड जाणार आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

यामुळे बेरोजगारीबरोबरच सामाजिक अस्वस्थता निर्माण होईल. ही अस्वस्थता कोरोनापेक्षा भयानक असेल.ते टाळायची असेल तर थोड्याफार प्रमाणात उद्योग सुरू करावे लागेल. यातून हळुहळु अर्थचक्र परत योग्य गतीला कसे येईल याकडेही लक्ष द्यावे लागेल.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

केंद्र व राज्य सरकार याविषयी गंभीरपणे विचार करतील व योग्य निर्णय घेतील. या निर्णयातून रोजगार टिकतील आणि लोकांची जीवही वाचेल, असेही श्री. भोगले यांनी नमूद केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

Rohit Sharma च्या मनातलं नाव जादुगारानं एकदम करेक्ट ओळखलं, हिटमॅनही झाला आवाक्; Video Viral

Latest Marathi News Live Update : कोणाला खुमसुमी असेल कर मैदान मोकळं आहे- धंगेकर

बाबो...! क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 8 वर्षाने लहान, शेअर केले फोटो, नेटकरी म्हणाले...'क्युट जोडी'

Rohit Sharma ने जिंकला आणखी एक पुरस्कार; गौतम गंभीरचं RO-KO बद्दल मोठं विधान, म्हणाला...

SCROLL FOR NEXT