संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणार का?

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - आधीच्या परिपत्रकाला फाटा देत शिक्षण विभागाने १ जुलैपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांमध्ये कमालीचा नाराजीचा सूर उमटत आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असल्याने शाळा सुरू करण्याची एवढी घाई का? मूठभरांच्या दबावाला बळी पडून तर आधीचा निर्णय बदलला नाही ना, असा प्रश्‍न शिक्षकांतून विचारला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गात शाळा सुरू करण्याचा सोस केल्यास ‘अफसोस’ होऊ शकतो, अशी भावनाही पालकांतून व्यक्त होत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अट्टहास नको 
लॉकडाउनमुळे कामगार, मजूर, कष्टकरी वर्गाच्या हाताला काम नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. बहुतेकांचा रोजगार गेला. उद्योग, व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशात शाळेचे शुल्क भरणे, पुस्तके खरेदी करणे अशक्य आहे. या भयानक परिस्थितीत १ जुलैपासूनच शाळा सुरू करण्याचा अट्टहास शासनाने करू नये. तसेच मुलांना पुस्तके व शाळेचे शुल्क भरण्यासाठी शासनानेच मदत करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

माशी कुठे शिंकली? 
आधी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार ९ वी, १० वी व बारावी शाळा व महाविद्यालये जुलैपासून, सहावी ते आठवी ऑगस्टपासून, तिसरी ते पाचवी सप्टेंबरपासून तर पहिली ते दुसरीचे वर्ग शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनंतर सुरू करण्याचे नियोजित होते. तशी तयारीही शिक्षक, पालकांनी केली होती. या निर्णयाला काही तास उलटत नाहीत तोच कुठे तरी माशी शिंकली आणि १ जुलैपासूनच शाळेच्या तयारीचे ढोल वाजू लागले. सध्या शहरी भागांमध्येच नव्हे, तर ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान सुरू आहे. त्यातच ४ हजारांवर शाळा, त्यातील ९ लाखांवर विद्यार्थी आणि १६ हजारांवर शिक्षकांची ये-जा सुरू होणार आहे. यातून एखादा शिक्षक किंवा विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर ती शाळाच नव्हे, तर इतर शाळांतही कोरोना पसरू शकतो. मग क्वारंटाइन कुणाकुणाला करणार, हा प्रश्‍न राहील. हा धोका वेळीच लक्षात घेता शाळा आधीच्याच परिपत्रकानुसार सुरू कराव्यात, अशी मागणी पालक-विद्यार्थी तसेच शिक्षकांतून होत आहे. 

हा होऊ शकतो पर्याय 
शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते, शाळा सुरू करण्याची घाई करू नये. प्राथमिकच्या तर नाहीच नाही. कारण यंदा कोरोनामुळे शाळा दीड-दोन महिने उशिरा सुरू झाल्यास त्याची भरपाई करता येऊ शकते. सर्वच शाळांमध्ये दर शनिवारी ‘हाफ डे’ घेतला जातो. यंदा शनिवारी पूर्णवेळ शाळा भरवावी. दुसरी बाब म्हणजे, दिवाळीची सुटी यंदापुरती पाच ते सहा दिवसच द्यावी. तसेच काही दिवस अतिरिक्त तासिकाही घेता येतील. यातून दीड-दोन महिन्यांचे नुकसान भरून काढता येईल. एवढ्यासाठी राज्यभरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही.

१ जुलैपासून केवळ नववी, दहावी व बारावीच्या शाळा, महाविद्यालये सुरू होत आहेत. १५ जूनपासून शालेय कामकाजासाठी शिक्षकांना शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु कंटेनमेंट झोन किंवा रेड झोनमध्ये असलेल्या शिक्षकांनी शाळेत जाऊ नये. तसेच अशा भागात असणाऱ्या शाळांत शिक्षकांनी हजर होऊ नये.’’ 
सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी (प्रा.) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

Dhangar Community: मेंढपाळ धनगरांसाठी अर्धबंदिस्त मेंढीपालन प्रकल्पाचे संकेत; कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक!

Hasan Mushrif Kolhapur Politics : जिल्हा बँक, गोकुळ, झेडपी, बाजार समिती आणि मंत्रीपद, मुश्रीफांचे ‘सब कुछ कागल’ मग जिल्ह्याला काय

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन अटकेत

Beed Illegal Mining: अवैध खदानीत मृत्यू; पीक विमा उचलून प्रशासनास डल्ला?;ज्ञानेश्वर सावंतच्या खदानीत घोटाळा

SCROLL FOR NEXT