soyabin market.jpg 
छत्रपती संभाजीनगर

बोगस बियाणांच्या तक्रारीनंतर आता शेतातच तयार होणार सोयाबीनचे सरळ बियाणे!

मधुकर कांबळे

औरंगाबाद : बियाणे उगवलेच नाहीत, कंपनीकडून फसवणूक झाली अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात. यामुळे बियाणांवरच्या खर्चाच शेतकऱ्यांना भूर्दंड सोसावा लागतो. यासाठी बियाणांवरचा खर्च कमी करण्यासाठी यंदाचं बियाणं पुढच्या वर्षासाठी राखून ठेवा, या धोरणानुसार शेतकऱ्यांना शेतातच बियाणे धरण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासाठी बियाणे दिले आहेत. यातून जिल्ह्यात सोयाबीनचे सुमारे २ हजार ३९० क्विंटल सरळ बियाणे उपलब्ध होणार आहे. 

पूर्वी शेतकरी बियाणे विकत घेण्यापेक्षा पुढच्या हंगामासाठी लागणारे बियाणे चालू हंगामातच शेतात धरले जायचे. मात्र नंतर उत्पादन वाढीच्या अपेक्षेने कंपन्यांची बियाणे वापरायला सुरुवात केल्याने शेतकरी बियाणांसाठी परावलंबी झाले. मग त्यातून कंपन्यांचे विकत घेतलेले बियाणांच्या तक्रारी सुरू झाल्या. या पार्श्वभूमीवर बियाणावरील खर्च कमी व्हावा यासाठी येथील कृषी विभागाने सोयाबीनचे बियाणे घरीच तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. 

यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी सांगितले की, बियाणावर करण्यात येणारा खर्च कमी व्हावा यासाठी शेतातच बीजोत्पादन करण्याला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ८ हजार ९६० किलो बियाणे जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले MAUS १५८ वाणाचे ३ हजार ७५० किलो आणि MAUS १६२ वाणाचे ५ हजार २१० किलो बियाणे आहे. १६२ वाण हे हार्वेस्टिंगसाठी खूप चांगले आहे. 

काढणीच्यावेळी शेंगा तडकून खाली पडून होणारे नुकसान या वाणात कमी होते कारण या वाणाच्या शेंगा जमीनीपासून काही अंतरावर लागतात. हे सरळ वाण आहेत. हायब्रीड वाणात मिक्सिंग असते. हायब्रीड वाण एकाच हंगामात उत्पन्न देते. तर सरळ वाणाचे बियाणे तीन हंगामात उत्पन्न देते म्हणजेच तीन हंगामात सोयाबिन बियाणाचा खर्च वाचणार आहे. यामुळे पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना दिलेल्या बियाणाचे पुढच्या हंगामासाठी बियाणे धरण्याचे आणि पुढील तीन वर्ष लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सरळ वाणाचे उरलेले बियाणे इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी राहणार असल्याचे ते म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Koyna Dam Water: कोयनेतील ‘महाजनको’चा कोटा संपुष्टात; वीजनिर्मितीवर परिणाम, राज्यात भारनियमनाचे संकट, सातारा-सांगलीसमोर पाणीटंचाईचे संकट

Monsoon Delay India : मान्सून श्रीलंकेतच रेंगाळला, केरळमध्ये 'या' दिवशी धडकणार; महाराष्ट्रातही आगमन लांबणीवर? IMD चा नवा अंदाज समोर

Maharashtra Cabinet Delhi visit: दिल्लीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाची धडक; साखर, कांदा आणि जलजीवन मिशनवर निर्णायक बैठक, शेतकरी आणि पाणी प्रश्नांवर मंथन

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश राहण्यासाठी बनवा थंडावा देणारे बडीशेपचे सरबत! लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT