tet certificate  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : साडेपाचशेवर शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्रांची होणार पडताळणी

शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता शिक्षण विभागाकडून प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्र परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकारानंतर आता शिक्षण विभागाकडून प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक पात्र परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. २०१३ पासून आत्तापर्यंत जिल्ह्यात ५६० उमेदवार सेवेत रुजू झाले आहेत. या सर्व उमेदवारांनी त्यांची मूळ प्रमाणपत्रे गुरुवारी (ता. सहा) दुपारी दोनपर्यंत शिक्षण विभागाला सादर करावी लागणार आहेत.(TET certificates of 500 teachers will be verified)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना टीईटी (TET Exam)परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणात अटक झाली. त्यांच्याकडून कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. टीईटी परीक्षा उत्तीर्ण होवून अनेक उमेदवारांनी नियुक्ती, पदस्थापना मिळवल्याचा संशय शिक्षण विभागाला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर औरंगाबाद जिल्ह्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये ३६० उमेदवारांची;तर जिल्हा परीषदेच्या शाळांमध्ये २०० उमेदवारांची नियुक्ती, पदस्थापना झाली आहे. या सर्व उमेदवारांचे टीईटी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्याअनुषंगाने औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक, शिक्षकांकडून टीईटी प्रमाणपत्राची सत्यप्रत जमा करण्यासाठी गर्दी होत आहे.(Aurangabad news)

गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी

जिल्हा परीषद, अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, अल्पसंख्यांक व इतर प्राथमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापकांनी विना विलंब १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती दिलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. गटशिक्षणाधिकारी यांनी विहीत नमुन्यात माहिती वेळेत सादर करावी. सदर माहिती अचूक असल्याची स्वतः गटशिक्षणाधिकारी यांनी तपासणी करावी. याबाबत भविष्यात काही प्रकरण उद्भवल्यास सर्वस्वी जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची असेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT