File Photo
File Photo 
छत्रपती संभाजीनगर

शोकांतिकाः औरंगाबाद महापालिकेकडे शववाहिनीही नाही ना रुग्णवाहिका!, आत्मनिर्भर कसे व्हायचे? 

मनोज साखरे

औरंगाबाद ः आरोग्य सुविधांसह सज्ज असल्याचा दावा एकीकडे प्रशासन करीत असताना औरंगाबादच्या महापालिकेकडे साधी एक शववाहिनीही नाही. ना मॉर्चरी कॅबीनेट. (मृतदेह ठेवण्यासाठीचे फ्रिज)

दुसरी धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या मालकीच्या रुग्णवाहिकाही नाहीत. ३८ आरोग्यकेंद्रे असणाऱ्या महापालिकेला किरायाच्या शववाहिनी आणि रुग्णवाहिकेवर काम चालवावे लागत आहे. कोरोना महामारीच्या या काळातही सुविधांचा वानवाच असल्याने आत्मनिर्भर होणार तरी कसे? हा प्रश्‍न आहे. 

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येने औरंगाबादकरांना धक्क्यावर धक्के बसत असतानाच कोरोनाने आरोग्य सुविधांचीही पोलखोल करायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या संकटात व्यवस्थापनाची अडखळत सुरवात झाल्यानंतर त्याचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत.

त्यातच महापालिकेकडे शववाहिनी आणि रुग्णवाहिका नसल्याचे स्पष्ट झाल्याने शहराच्या आरोग्य सुविधांचे दावे कमकुवत ठरत आहेत. शासनाच्या १०८ या पाच आपत्कालीन रुग्णवाहिका आणि किरायाच्या रुग्णवाहिकेवरच रुग्णांच्या वाहतुकीची बोळवण महापालिका करीत आहे.

आतापर्यंत ३४ कोरोनबाधितांचा मृत्यू झाला. एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाचा सकाळी आठ वाजता मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी रात्री आठ वाजतात. असा प्रकारही यापूर्वी घडला. सोयी-सुविधांच्या अभावामुळे असे प्रकार घडत आहेत. 

संसर्गाचा धोका 
मृतदेह डिकंपोज होण्यास सुरवात होते. वासही येतो. यातून संसर्गाची भीती असते. परत मृतदेहाची विल्हेवाट लावताना बाधा होण्याचा धोकाही असतो. तत्काळ मृतदेह डिस्पोज करावा, असे निर्देश आहेत. त्यामुळेच महापालिकेला शववाहिनी आणि रुग्णवाहिकेची गरज आहे. 

आत्मनिर्भर कसे होणार? 
महामारीच्या काळात सर्व सुसज्ज व्यवस्था लावल्याचा दावा शासन करीत असताना प्रशासनाकडे आरोग्यविषयक साधनांचा तुटवडा आहे. शहरात कोविडची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या आसपास पोचत असताना महापालिकेकडे साधी शववाहिनी आणि स्वतःच्या रुग्णवाहिका नाहीत. त्यामुळे महापालिकाच आत्मनिर्भर नसून त्यांना किरायाच्या कुबड्यांचा वापर करावा लागत आहे, ही एकप्रकारे शोकांतिकाच आहे. 

शववाहिनी व रुग्णवाहिकेबाबत महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांना संपर्क केला; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही; तसेच टेक्स्ट मेसेजलाही रिप्लाय न आल्याने त्यांच्याकडून अधिक तपशील कळू शकला नाही. 

आम्ही बजेट दिले. त्यातून खरेदी करणार आहोत. शासनाने कोविडसाठी महापालिकेला पाच रुग्णवाहिका दिल्या आहेत. शववाहिनी व तीन रुग्णवाहिका किरायाने घेतल्या आहेत. 
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT