Two Wheller 
छत्रपती संभाजीनगर

मध्यरात्री दोन भरधाव दुचाकींना कुत्रे आडवे गेल्याने भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: सिडकोकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या दोन भरधाव दुचाकींना कुत्रे आडवे आल्यानंतर त्यांची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींवरील चालक तब्बल ५० फूटांपर्यंत फरफटत गेले. यात ते गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान बुधवारी (ता.९) त्यांचा मृत्यू झाला. आकाशवाणी चौकात मंगळवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला.

सय्यद आवेज सय्यद गाझी (२३, रा. जलाल कॉलनी) आणि सद्दाम सय्यद चाँद (२८, रा. संजयनगर, बायजीपुरा) अशी मृतांची नावे आहेत. आवेज हा गॅरेजवर काम करीत होता तर सद्दाम हा मटन शॉप चालवित होता. सद्दाम विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. 

जवाहरनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आवेज हा मित्रासोबत दुचाकीने सिडकोकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जात होता. त्याचवेळी सद्दामदेखील आपल्या मित्रासोबत वेगळ्या दुचाकीने सिडकोकडून बाबा पेट्रोल पंपाकडे जात होता. दोन्ही दुचाकी आकाशवाणी चौकात येताच समोरून कुत्रे आडवे गेले. त्यामुळे त्यांची आपसात धडक झाली. त्यानंतर दोन्ही दुचाकी चालकांचा ताबा सुटला आणि ते रस्त्यावर पन्नास फूट फरफटत गेले.

यात चालक आवेज आणि सद्दाम हे गंभीर जखमी झाले. तर, पाठीमागे बसलेल्या तरुणांनाही गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच आवेजचा भाऊ सय्यद फैज हा घटनास्थळी धावला. तसेच, जवाहरनगर आणि जिन्सी ठाण्याचे पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी जखमींना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना आवेज आणि सद्दाम यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक फौजदार दत्तात्रय बोटके यांनी मदतकार्य केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT