mini ghati.jpg
mini ghati.jpg 
छत्रपती संभाजीनगर

राज्यात पहिला प्रयोग : औरंगाबादेतील कोरोनाबाधितांना पंचगव्य औषधींचा होतोय लाभ

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : मिनी घाटीत कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या तसेच येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णांवर वेरूळ येथील एका सेवाभावी ट्रस्टतर्फे रोग प्रतिकारक्षमतावर्धक पंचगव्य भोज्य प्रकारातील औषधींचा वापर करण्यात येत आहे. 

आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने वेरूळ येथील अवधूत आयुर्वेद व पंचगव्य अनुसंधान केंद्र संचालित दत्ताश्रम सेवाभावी ट्रस्टतर्फे गुजरात येथे ही औषधी पुरविण्यात आली. त्यानंतर आता राज्यातही सर्वप्रथम पंचगव्य भोज्य औषधीचा वापर कोविड-१९ रुग्णांवर करण्यात येत आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका 
वेरूळ येथील टाका आश्रमातर्फे या औषधी मोफत देण्यात येत आहेत. टाका आश्रमाला हजारो वर्षांची परंपरा आहे. आश्रम परिसरात वनौषधींची संपदा आहे. स्वामी विद्यावामदेवतीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व विधितात्मानंद यांच्या प्रेरणेने हे केंद्र कार्यरत आहे. केंद्राअंतर्गत संशोधकांची टीम कार्यरत आहे. त्यामध्ये प्रमुख संशोधक डॉ. ज्ञानेश सालगुडे (एम. डी. मेडिसीन), डॉ. भारती नागरे (बालरोगतज्ज्ञ) व फार्मासिस्ट अरविंद यांच्या अथक प्रयत्नांतून आयुषच्या निर्देशानुसार पंचगव्य भोज्य औषधींची निर्मिती करण्यात आली आहे.

पंचगव्य भोज्य औषधी आहे काय? 
आयुर्वेदामध्ये पंचगव्याला विशेष स्थान आहे. पंचगव्य चिकित्सा पद्धती सृष्टीच्या पंचमहाभूत तत्त्वावर आधारित आहे. विशेष म्हणजे पंचगव्यामध्ये सर्व भोज्य औषधी आहे. या औषधीमध्ये प्रामुख्याने देशी गाईचे गोमूत्र (बाष्पीकृत), देशी गाईचे तूप, मिरे, तुलसी, अद्रक, मुलेठी, हळद, पुणर्नवा आदींचा समावेश आहे. या सर्व औषधी आपल्या दररोजच्या वापरातील असून त्यांना भोज्य औषधी म्हटले जाते; मात्र या औषधीत सूक्ष्मीकृत (नॅनो) करण्यात आल्या आहेत. 

पाचशे पोलिसांना अर्काचे केले निःशुल्क वाटप 
पाचशे पोलिसांना प्रिव्हेंटिव्ह अर्काचे निःशुल्क वाटप केलेले आहे. शासकीय रुग्णालयात रोग प्रतिकारक्षमतावर्धक म्हणून या औषधींचे कोविड रुग्णांवर यशस्वी व सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत आहे. 

संपादन-प्रताप अवचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT