Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रचंड वाढणारा ट्रेंड... वाचा 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : अडीच अक्षरी असलेल्या प्रेमाच्या शब्दांचे मोजमाप कुठल्याही तराजुने होत नाही. तरीही आजच्या दिवशी प्रेम व्यक्‍त करायचे कुणीही थांबवत नाही. प्रेम म्हणजे नरजेतून हदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे दोन जीव, दोन हदय, पण, एकच श्‍वास.. अशा या जागतिक प्रेम दिवस अर्थात "व्हॅंलेन्टाईन डे' च्या दिवशी अलिकडे विवाहबंधनात अडकण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. 

प्रेम ही नैसर्गिक भावना असून सृष्टीतील केवळ मनुष्य नव्हे तर प्रत्येक सजीव कुणावर ना कुणावर तरी निस्सीम प्रेम करत असतो. याच भावनेला खास करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी जगभर "व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जातो. त्याची पूर्वतयारी तरुणाई आठवडाभरापासून करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषत: सोशल मिडीयावर तर आठ दिवसांपासून प्रेम एके प्रेम याबद्दलचेच मॅसेज पाहायला मिळत आहेत. 

या प्रेमदिनीच आपण आयुष्यभरांसाठी ऐकमेकांचे होवून जायचे, असे ठरवून प्रेम असलेले तसेच लग्न जमल्यानंतर प्रेमात पडणारे व्हॅलेंन्टाईन डेचा महूर्त साधत आहेत. आजच्या दिवशी केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातदेखील विवाहाचा धुमधडका पाहायला मिळतोय. काळानुसार होणाऱ्या या बदलाचे साक्षीदार होऊ पाहणाऱ्यांनी हा जणू नवीन ट्रेंडच सुरु केला आहे. आपला विवाहदिन कायमस्वरूपी आवडत्यादिनी असावा, अशीच भावना पुढे येत असल्याने या दिनाचे एक प्रकारचे वेडच तरुणाईमध्ये निर्माण झाले आहे. 

तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रत्येकाला या प्रेमदिनाबद्दल वेगळं महत्व असते. याच दिवशी लग्न व्हावं, अशी इच्छा आम्ही व्यक्त केली आणि ती पूर्णही होत आहे. प्रेमदिनी आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत असताना प्रेमाबद्दलच्या मनातील भावना निश्‍चितच जपणार आहोत. 
- प्रशांत बालाजी आडसूळ, कृषी अधिकारी, बॅंक ऑफ इंडिया, (मुळ गाव रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.)

मागील काही वर्षांपासून 7 ते 14 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येक दिवसाला अफलातून कल्पना देत नावे दिली आहेत. त्यामुळे या सात दिवसांत आपल्या प्रियजनांना काय काय गिफ्ट द्यायचे याचे दिवस ठरवलेले आहेत. त्यानिमित्त सात दिवस बाजारात वेगवेगळ्या वस्तू खरेदीला बहर आलेला आहे. 

तरुणाई "व्हॅलेंटाईन डे'साठी चॉकलेट, टेडी बेअर, फुले अशा नेहमीच्या भेटवस्तूंना फाटा देत, काहीतरी हटके करण्यासाठी उत्सुक असतात. या व्हॅलेंटाईन स्पेशल वीकसाठी तरुणाईने अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेले असते. यात आपल्या प्रियजनांना आवडणारी एखादी वस्तू ऑनलाइन खरेदी करायची आणि व्हॅलेंटाईन वीकमधल्या त्या दिवशी ती ऑनलाइन मागवलेली वस्तू आपल्या प्रिय व्यक्तींना भेट म्हणून द्यायची. यामध्ये आकर्षक मोबाईल कव्हर, फोटो फ्रेम, बिग टेडी, चॉकलेट्‌स किंवा प्रेमाचा संदेश यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश असतो.

तसं पाहिलं तर प्रत्येक दिवस हा प्रेमाचा असतो. पण हा दिवस त्यातही प्रेमाचा दिवस मानून प्रेम व्यक्त केले जाते. म्हणूनच की काय प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा, आनंदाचा, आयुष्याच्या नव्या वळणाचा सुखद असणारा क्षण म्हणजे लग्न आणि हाच क्षण हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय व्हावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशी आमचीही आहेच. आमच्या नवीन आयुष्याची सुरवात याच दिवशी होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. 
- मनीषा बाबासाहेब गवळी, मंडळ कृषी अधिकारी, (मुळ गांव, रा. रोहिणा (खु), ता. परतूर, जि. जालना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अभिनेते शेखर सुमन यांनी घेतली जेपी नड्डा यांची भेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT