Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

बंद झालेल्या नोटांचे करतात तरी काय ? जाणून घ्या सविस्तर..!  

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या नोटा कुणाला सापडल्या तरी सामान्य माणूस त्याला हातही लावणार नाही. मात्र, अजूनही जुन्या नोटांचा धंदा जोरात सुरू असल्याचे दोन दिवसांपूर्वी पकडण्यात आलेल्या ९९ लाख रुपयांच्या नोटांवरून स्पष्ट होते आहे. या जुना नोटा सध्या जातात तरी कुठे, त्यांचे काय केले जाते असा प्रश्‍न सामान्यांना पडला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

जुन्या नोटा घेऊन नव्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरवातीला जोरात सुरू होता. कालांतराने तो बंद झाला असे वाटायचे; मात्र तो अजूनही सुरूच आहे. जुन्या नोटा कशा बॅंकेत भरणा करतात? यात आणखी कोणी बडी आसामी सहभागी आहे का?, जुन्या नोटा देवाणघेवाण व्यवहारात सामील होत असतील का, या इतक्‍या मोठ्या रकमेच्या जुन्या नोटा कुठून आल्या? जुन्या ९९ लाख रुपयांच्या बदल्यात नव्या किती लाखांच्या नोटा देत होते, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. मात्र, याचा शोध सुरूच आहे. 


नोटाबंदी झाल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आढळून आलेल्या आहेत. त्यानंतर त्यावर फारसे बोलल्याही गेलेले नाही. आजही या नोटांबद्दल सविस्तर सांगितले जात नाही. कालच्या घटनेनंतर काही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी यावर फार बोलता येणार नाही, जास्त माहिती नाही, असे उत्तरे दिली. 

सत्र थांबेना 
पाचशे, हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्याचे जाहीर झाल्यानंतर या नोटांचे एका झटक्यात मोल शून्य झाले. या नोटांचे करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. ज्यांनी बेकायदेशीर मार्गाने पैसा कमवला त्यांनी नोटा जाळल्या. वाहत्या पाण्यात फेकून दिल्या. तरीदेखील जुन्या नोटा सापडण्याचे सत्र थांबलेले नाही. 


चलनातून बाद झालेल्या नोटा बदलून देण्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आलेली होती. तोपर्यंतच रिझर्व्ह बॅंकेकडून अशा नोटा बदलून देण्यात आलेल्या आहेत. आता हे बंद झालेले आहे. त्यामुळे या नोटा एकतर संबंधितांना वेळेत बदलता आलेल्या नसतील किंवा त्यांनी बदलून घेतल्या नसतील. यामुळे हे काहीतरी वेगळं प्रकरण असल्याची शक्यता वाटते.
देविदास तुळजापूरकर, बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT