औरंगाबाद : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईचा सिझन बुडाला आहे. त्यामुळेच फोटोग्राफर आणि त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यामध्ये साधारण पाच कोटीपेक्षा अधिकचा व्यावसाय बुडाला आहे. फोटोग्राफर आणि या व्यावसायातील हातावर रोजंदारी असलेल्या कामगारांना उपासमारीला समोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री स्वतः एक फोटोग्राफर असल्याने, त्यांना या व्यवसायातील व्यथाही माहित आहेत. ते नक्की दिलासा देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च, एप्रिल आणि मे असे साधारण तीन महिने फोटोग्राफर्स आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या जिल्हाभरातील पाच हजार फोटोग्राफर्स व त्यांच्यावर अवलंबुन असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात अंदाजे पाच ते सात कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला असल्याचे औरंगाबाद फोटोग्राफर्स असोशियनचे माजी अध्यक्ष किशोर निकम यांनी सांगीतले. मार्च, एप्रिल, मे असे तीन महिने फोटोग्राफर्स साठी महत्वाचे आहेत. लग्नसराईच्या या दोन तीन महिन्यात फोटोग्राफर्स आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांची वर्षभराची कुटुंब चालवता येईल अशी कमाई होते.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
नोटाबंदीचाही होता परिणाम
गेल्या वर्षीही नोटाबंदीचा व्यवसायावर परिणाम झाला होता. धुमधडाक्यात होणारे लग्न समारंभावर मर्यादा आल्याने फोटोग्राफी, व्हीडिओग्राफीवरही परिणा झाला होते. त्यामुळे सहाजिकच फोटोग्राफर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना फटका बसला होता. या वेळी चांगला व्यवसाय होईल अशा अपेक्षा पल्लवित झालेल्या असतानाच कोरोना महामारी चे संकट येऊन ठेपले. या कोरोनामुळे यंदा एकही विवाह समारंभ झाला नाही.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
भविष्या बद्दल साशंकता
लॉकडाऊन नंतरही या व्यवसायाला केव्हा भरभराटी घेता येईल हे सांगणे अवघड आहे. कोरोना मुळे यापुढेही सोशल डिस्टंन्सींगचे बंधन मात्र कायम राहणार आहे. त्यामुळेच लग्नांच्या संख्येवरही आपोआप मर्यादा येण्याची शक्यता आहे. असे झाले तर हा व्यवसाय भविष्यात उभा राहील की नाही याबद्दल साशंकता आहे. जिल्ह्यामध्ये साधारण आठ हजाराच्या जवळपास फोटोग्राफर काम करतात. एकट्या औरंगाबाद शहरात आठशे ते हजार फोटोग्राफर काम करत आहेत. या फोटोग्राफर्स शिवाय अल्बम डिझाईनिंग, व्हिडिओ मिक्सिंग, प्रिंटिंग, ड्रोन, एलईडी स्क्रीन, क्रेन असे विविध व्यावसायिकही अवलंबून आहे. यंदा या व्यवसायावर गडांतर आल्याने फोटोग्राफर्स आणि त्यांच्यावरील व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
काय म्हणतात व्यावसायीक
मुख्यमंत्री दिलासा देतील
किशोर निकम (औरंगाबाद फोटोग्राफर्स असोशियनचे माजी अध्यक्ष) : कुटुंब कसे चालवावे असा प्रश्न फोटोग्राफर्सला सतावत आहे. मुलांचे शिक्षण, घर भाडे, कर्जाचे हप्ते अशा विवंचनेत सापडलेल्या फोटोग्राफरला मुख्यमंत्र्यांकडून मात्र अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री स्वतः एक फोटोग्राफर असल्याने, त्यांना या व्यवसायातील व्यथाही माहित आहेत. ते निश्नित दिलासा देतील अशी अपेक्षा आहे.
झोप उडाली आहे
काझी एम. बी. (अलबम डिझाईनर) : मी लग्नाचे अलबम डिझाईन करतो. कोरोना आणि लॉकडाऊन मुळे लग्न व इतर हंगाम वाया गेला. परिणामी आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आम्ही सर्व व्यावसायीक आर्थिक संकटात सापडलो आहे. दुकानाचे भाडे, लाईट बील, कर्जाचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च ह्याचा विचार करून झोप उडाली आहे
आँपरेटर्सला मदत करा
शंकर रामचंदाणी (स्क्रीन प्रेक्षपण व्यावसायीक) : लग्न समारंभात एलईडी लाईट, स्क्रीन प्रक्षेपण करण्याचा माझा व्यावसाय आहे. आमच्याकडे काम करणारे आँपरेटर हे रोजंदारीवर काम करणारे आहेत. ७५ टक्के आँपरेटर आणि कामगार हे हातावर पोट भरणारे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे.
राहुल मालाणी (फोटो लॅब व्यावसाईक) : फोटो लॅब हा व्यावसाय स्मॉल स्केल इंडस्ट्रिज मध्ये मोडतो. त्यामुळे महावितरण १५ रुपये प्रति युनिट आकारणी करते. त्यामुळे लाईट बीलाचे दर तसेच पेट्रोल, डिझेलचे दर आणि व्यावसायीक कर्जाचे व्याजदर किमान सहा महिने कमी केले पाहिजेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.