Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad | धक्कादायक ! औरंगाबादेत पती-पत्नीचा निर्घृण खून, मुलगा फरार

एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असताना दाम्पत्याच्या खूनाची हत्या उघडकीस आल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : औरंगाबादमधील पुंडलिकनगर येथे आज सोमवारी (ता.२३) घरात पती-पत्नीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दोघांचा खून केल्यानंतर आरोपी घराला बाहेरुन कुलूप लावून फरार झाले आहेत. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असताना दाम्पत्याच्या खूनाची हत्या उघडकीस आल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ उडाली आहे. श्यामसुंदर हिरालाल कलंत्री (वय ५५) आणि किरण श्यामसुंदर कलंत्री ( ४५) अशी मृतांची नावे आहेत. श्यामसुंदर कलंत्री हे भांडे व्यापारी आहेत. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती कलंत्री यांच्या शेजारी सविता सातपुते यांनी पोलिसांना दिली. (Wife And Husband Brutally Murdered In Aurangabad, Son Ran Away)

पोलिसांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला असता वेगवेगळ्या मजल्यावर पती-पत्नीचे मृतदेह पोलिसांना पलंगाखाली लपवून ठेवल्याचे आढळून आले. घटना घडल्यापासून त्यांचा मुलगा आकाश हा फरार असून त्याचा फोनही बंद येत आहे. या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. आई-वडिलांचा मोबाईल लागत नसल्याने चिंतेत असलेली मुलगी औरंगाबादला परतली. मात्र घराला कुलुप असल्याने मावशी मानलेल्या सविता सातपुते यांच्या घरी थांबली.

त्यानंतर आज सकाळी ती घरी आली तेव्हा दुर्गंधी येत होती. सविता सातपुते यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला असता सदरील घटना उघडकीस आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT