औरंगाबाद : सिडको चौक ते हर्सुल टी पॉईंट रस्त्याला एकाच बाजूने सर्व्हिस रोड आहे. मात्र, त्यातील अडथळ्यामुळे सात किलोमीटरच्या रस्त्यात पाच ठिकाणी रॉंगसाईड निर्माण झाले आहेत. तर, दोन ठिकाणी दुचाकी आणि खासगी बसेस चक्क फुटपाथवरुनच धावत असल्याचे चित्र आहे. एसबीओए शाळेसमोर विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. अतिक्रमणामुळे आंबेडकर चौक हे अपघाताचे केंद्र बनले आहे.
सिडको बसस्थानकासमोर दुभाजक बसवल्याने ये-जा करण्यासाठी सारस्वत बॅंकेसमोरील चौकाचा वापर होत आहे. मात्र, याठिकाणी दुभाजकातील अपुऱ्या अंतरामुळे एसटी वळण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे बसस्थानकासमोरील वाहतुकीचा गोंधळ इथेही सुरु झाला आहे. काळा गणपती मंदीर ते वोक्हार्ट चौकादरम्यान असलेल्या भोले पान सेंटर येथेही सिग्नलची गरज आहे. गणपती मंदीरासमोर दुभाजक जोडल्याने इथून मोठी वर्दळ असते. मंदिरात पायी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
एन सात येथून आंबेडकरनगर येथे दुभाजकाच्या मधून नागरिक जात असताना वाहतुकदारांचा खोळंबा होतो. शाळकरी मुले, पालक मोठ्या प्रमाणात रस्ता ओलांडतात. रेणुका माता मंदीरासमोरील सर्व्हिस रोडवर खांब लावल्याने तिथून मोठी वाहने जाऊ शकत नाहीत. एसबीओए शाळेसमोरील सिग्नल बंद तसेच सर्व्हिस रोडचा मार्ग बंद केल्याने शाळेची मुले नेण्यासाठी आलेले पालक रस्त्यावरच गाडी लावतात. मयुरपार्ककडे जाणाऱ्या मुलांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागतो.
हर्सुल कारागृहाकडून जळगाव रस्त्यावर येणाऱ्यासाठी सिग्नलच नाही. कुठे पहावे हा वाहनधारकांना प्रश्न पडतो. हर्सुल टी पॉईंट ते गणपती मंदीरापर्यंत सर्व्हिस रोड नाही. आंबेडकरनगर येथे तर मुख्य रस्त्यावरही अतिक्रमण झाले आहे. त्यात पुन्हा रिक्षा उभ्या राहिलेल्या असतात. सिग्नल सुटल्यानंतर रिक्षा आणि वाहनधारकांच्या घाईने या गेल्या महिन्यातही जीवघेणे अपघात याठिकाणी घडले आहेत. यासाठी रॉंगसाईड रोखणे आणि अतिक्रमण हटवणे हे दोनच मार्ग आहे.
सर्व्हिस रोडवरील अडथळे..
असे आहेत चौक...
वसंतराव नाईक चौक
सिडको बसस्थानक
एसबीआय बॅंक
वोक्हार्ट चौक
एन. सात चौक
आंबेडकर चौक
अहिल्यादेवी होळकर चौक
सौभाग्य चौक
एसबीओए शाळा चौक
हर्सुल टी पॉईंट चौक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.