0Party_2 
छत्रपती संभाजीनगर

यंदा घरीच साजरा होणार थर्टी फर्स्ट, रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका

प्रकाश बनकर

औरंगाबाद : नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. शहर, जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे थर्टी फर्क्टचे सेलीब्रेशन हॉटेल, रेस्टॉरंटऐवजी आता घरीच करावे लागणार आहेत. कारण हॉटेल, बार हे रात्री साडे दहा वाजता बंद करावे लागत आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी सांगितले.


सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांचे उत्साह, जल्लोषात स्वागत करण्यासाठी दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. हॉटेल, रेस्टॉरंट व दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईचा लखलखाट केला जातो. तरुणाईचा बेभान जल्लोष पहाटेपर्यंत रंगतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे सेलिब्रेशन नसणार आहे. साडेदहा वाजेनंतर संचारबंदीचे निर्देश आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टची वर्षभर वाट बघणाऱ्या हॉटेल-बार चालकांचा यावेळी मात्र, हिरमोड होत आहे. हॉटेल व्यवसाय आधीच तीस टक्क्यांवर आला आहे. त्यात यंदा थर्टीफर्स्टचा जल्लोष नाही. त्यामुळे एकही बुकींग झालेली नाही. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम जाणवत असल्याचेही श्री.मनगटे यांनी सांगितले.



राज्य उत्पादन शुल्कची राहणार मद्यपींवर नजर
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्यपींवर नजर ठेवण्यात येणार आहेत. विना परवानगी मद्य पिणाऱ्यावर तसेच अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांवरही या विभागाची नजर असणार आहेत. याच काळात दरवर्षी मोठ्या कारवाई विभागातर्फे करण्यात येत असतात. यंदा रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे शहर व जिल्ह्यातील हॉटेल,धाब्यांची तापसणी आणि कारवाई करण्यात येणार आहे. यंदाही भरारी पथक कारवाईसाठी सज्ज असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी सांगितले.



असे असेल पथक
-विभागाचे एकूण ९ स्कॉड आहेत.
-पाच नियमात पथके
-चार विशेष पथकांचा समावेश असेल.


 

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT