सेनगाव ः सध्या धकाधकीच्या जीवनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मोठी मंडळी दुचाकीचा सर्रास वापर करतात. त्यातच सध्याचे तंत्रज्ञानाचे युग पाहता लहान मुलांना मोबाईलचे वेड फार वाढल्याचे दिसून येते. मात्र, याला अपवाद ठरली आहेत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील बच्चेकंपनी. ही मुले मिळेल त्या मोकळ्या जागेत, मैदानात सायकल चालवित आहेत. त्यातून त्यांचे सायकलवरील प्रेम दिसून येते. मागील काही महिन्यांपासून बच्चे कंपनीमध्ये सायकल चालविण्याची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे विविध लहान - मोठ्या आकर्षक सायकलींची मागणी वाढली आहे.
मुले व मुलींमध्ये विविध नवनवीन सायकलींचे आकर्षण
मागील काही महिन्यांपासून लहान मुलांमध्ये सायकलचे आकर्षक वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वयाच्या पाचव्या वर्षीच लहान मुले सायकल चालविण्यात रंगू लागली आहेत. पाच ते पंधरा वर्षे वयोगटातील मुले व मुलींमध्ये विविध नवनवीन सायकलींचे आकर्षण असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांत असलेल्या मोकळ्या जागी व रस्त्यावरून बच्चेकंपनी सायकल चालविण्याचा आनंद घेतात. बहुतांश कुटुंबांमध्ये लहान-मोठ्या सायकली असून सायकलच्या आकर्षणामुळे मागणीतही सातत्याने वाढ होऊ लागली आहे. लहान मुलांनी सायकल चालवल्यामुळे त्यांना आरोग्याचे अनेक फायदे होतात.
हेही वाचा - ‘या’ उरुसामुळे गावकरी जमतात एकत्र
धावपळीमुळे वाढला दुचाकीचा वापर
दिवसेंदिवस धावपळीचे व धकाधकीचे जीवन होऊ लागल्यामुळे कमी वेळात जास्त कामे करण्यासाठी तरुण व मोठ्या मंडळींमध्ये एक प्रकारे स्पर्धात्मक चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी धावपळीमुळे सहाजिकच आरोग्याच्या काळजीकडे दुर्लक्ष होते. शारीरिक मेहनत कमी होत असल्याने विविध आजार उद्भवतात. आजाराची लक्षणे जाणवल्यावर डॉक्टरांकडे जावे लागते. तेथे त्यांना दररोज व्यायाम, योगासन, वाहनाचा कमी वापर करण्याचा सल्ला दिला जातो.
हेही वाचा - अरे बापरे, बांधकाम साहित्याला आला सोन्याचा भाव
विविध आरोग्याच्या तक्रारी कमी होतात
महाविद्यालयीन मुले व मोठ्या मंडळींमध्ये दुचाकीचे आकर्षण आहे. मात्र, कोणत्याही वयातील व्यक्तींनी सायकल चालविणे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जाते. सायकल चालवल्यामुळे ब्लडप्रेशर स्थिर राहते, स्कीनमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा प्रवाह होत असल्याने त्वचा जास्त चांगली व चमकदार दिसते. झोप न येण्याची समस्या दूर होते. सायकलिंग केल्याने शरीरातील सर्वच मसल्स हेल्दी आणि मजबूत होतात. लठ्ठपणा कमी होऊन वजन घटते, यासह विविध आरोग्याच्या तक्रारी कमी होतात. सायकल चालविणे हा एक अतिशय उपयुक्त व्यायाम आहे. बच्चे कंपनीत क्रेझ वाढल्याचे चित्र आहे.
खरेदीदार ग्राहकांची संख्या वाढतेय
मागील काही महिन्यांपासून लहान व मोठ्या मुलांमध्ये सायकलींचे मोठ्या प्रमाणात आकर्षण वाढले आहे. मुलांच्या आवडीनुसार बाजारात आकर्षक नवनवीन सायकली दाखल होऊ लागल्या आहेत. सायकल खरेदीदार ग्राहकांची संख्या वाढत आहे. एका महिन्यात लहान-मोठ्या १५ सायकलींची विक्री होते. -महेश डहाळके, विक्रेता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.