zp aurangabad.jpg 
मराठवाडा

Good News : बजाजनगर, पंढरपूरला होणार नवीन आरोग्य केंद्रे

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण समितेचे सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.०२) झालेल्या बैठकीत तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या वाळूज परिसरातील पंढरपूर आणि बजाजनगर- वडगाव कोल्हाटी तसेच फारोळा  भागामध्ये नवीन आरोग्य केंद्रे स्थापन करण्याचा आरोग्य समितीमध्ये ठराव मंजूर केला आहे,  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली. 

जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी स्थायी समितीच्या सभेत या विषयी ठराव मांडला होता. तसेच आरोग्य समिती सभापती गलांडे पाटील तसेच बांधकाम सभापती किशोर बलांडे आदींकडे पाठपुरावा केला होता असे सकाळ शी बोलतांना सांगितले. कोरोना विषाणू ने ह्या परिसरात थैमान घालत तीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यावेळी तोकडी आरोग्य यंत्रणा असल्याने नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरे जावे लागले होते. अशा कठीण परिस्थितीत जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी उपोषण केले होते. त्यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी दिलेल्या आश्वसनानुसार पंढरपूर आणि बजाजनगर वडगाव कोल्हाटी येथे आरोग्य केंद्रे होणार असल्याने रमेश गायकवाड यांनी सांगीतले. गायकवाड  यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने वाळूज परिसरातील नागरिकही आनंद व्यक्त करत आहेत.

त्या महिलेला व्हेंटिलेटर मिळाले; डॉ. गंडाळ यांचे अभिनंदन 
बजाजनगर वाळूज परिसरातील कोरोनाग्रस्त एका महिलेला तेथे आरोग्य सामग्री उपलब्ध नसतांनाही वेळेत व्हेंटीलेटर ची सुविधा पुरविल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी उल्हास गंडाळ यांचे अभिनंदन केले. सर्व आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अशी आपत्कालीन परिस्थिती उदभवेल तिथे तिथे मदतीसाठी आरोग्य यंत्रणेने सज्ज राहावे अशा सूचनाही सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी बैठकीत केल्या. 

जिल्हापरिषदेचे आरोग्य सभापती .अविनाश गलांडे पाटील यांनी बजाजनगर येथील आरोग्य उपकेंद्र पाहणी केल्यानंतर चार लाख लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्राला आरोग्य केंद्राची अत्यंत गरज होती व ती आम्ही पूर्ण करण्यात यशस्वी झालो आहोत. याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रमेश गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार ठराव मंजूर झाला असून लवकरच अंदाजपत्रके मागवून नवीन सुसज्य आरोग्य केंद्राची इमारत उभी राहील, व पंढरपूर येथेही लवकरच काम सुरू होईल असे सांगितले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT