practical mark.jpg 
मराठवाडा

विद्यार्थ्यांनो परिक्षेसाठी निवडा पर्याय ! ऑनलाईन, ऑफलाईनचे वेळापत्रक ही घ्या जाणून !  

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड) : यंदा कोविड विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मार्च, एप्रिल मध्ये होणाऱ्या सर्व परिक्षा रद्द करण्यात आलेल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे बंधनकारक असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरू होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला योग्य तो पर्याय निवडावा असे आवाहन लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. परळीकर यांनी केले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० मध्ये होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परिक्षा व इतर सत्र वर्षामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा १ आँक्टोबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांना याचा संसर्ग होवू नये म्हणून ही परिक्षा विद्यार्थ्यांना आँनलाईन किंवा आँफलाईन पध्दतीने महाविद्यालयात देता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी अगोदर योग्य पर्याय निवडायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेटसह मोबाईल, आयपँड, संगणक उपलब्ध आहे, त्यांच्या घराजवळच्या विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, एमकेसीएल केंद्राकडून उपलब्ध होत असेल त्या विद्यार्थ्यांनी ही परिक्षा आँनलाईन पध्दतीने द्यावी. ज्या विद्यार्थ्यांकडे ही सुविधा उपलब्ध नाही. त्या़ची परिक्षा ही निवडलेल्या महाविद्यालयाकडे ओएमआर पध्दतीने त्या महाविद्यालयात देता येईल. 

ही असेल परिक्षेची वेळ ! 
कोविडच्या प्रादुर्भावामुळे ही परिक्षा एका तासाची बहूपर्यायी पध्दतीने होणार आहे. विद्यापीठाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार आँफलाईन, आँनलाईन या दोन्ही पैकी एका पध्दतीने विद्यार्थ्यांना परिक्षा देता येणार आहे. तसेच ज्यांनी आँनलाईन पर्याय निवडला आहे. त्याची परिक्षा सकाळी ९ ते १ पर्यंत व दुपारी २ ते ६ यावेळेत कोणत्याही एका तासात सोडवायची आहे. ज्यांनी आँफलाईन पर्याय निवडला आहे. त्यांची परिक्षा महाविद्यालयात सकाळी ९ ते १ यावेळेत पहिल्या तासात म्हणजे ९ ते १० या वेळेत व दुसऱ्या सत्राची परिक्षा २ ते ६ वेळेमधील २ ते ३ या वेळेत देणे बंधनकारक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कोविड विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही परिक्षा आँनलाईन पध्दतीने द्यावी. यासाठी महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग्य तो पर्याय लवकरात लवकर निवडावा असे आवाहन प्राचार्या डॉ. परळीकर यांनी केले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

Crime News : तुझे बाळ दे, एक लाख रुपये देते; दलाल माय-लेकीने विकत घेतला नवजात शिशू, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT