crime sakal 
मराठवाडा

निर्दयी पतीचे क्रूर कृत्य, वंशाचा दिवा पाहिजे म्हणून पत्नीची

सकाळ वृत्तसेवा

बीड : मुलाचा आजाराने मृत्यू झाला. पत्नीची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्याने आता तीला मुल होणार नाही म्हणून पत्नीने लाकडाने मारहाण करून व रात्रभर बांधून ठेवत पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील औरंगपूर येथे समोर आली. राधा महादेव रेड्डे (वय ३०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी महादेव आसाराम रेड्डे (वय ३६, रा. इरगाव, ता. गेवराई) याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली.


दहा वर्षांपूर्वी पैठण येथील राधा हिचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव रेड्डे याच्यासोबत झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य झाले. मात्र दुर्दैवाने आठ वर्षाच्या मुलाचे दोन वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. मुलाचा मृत्यू झाल्याने आपल्या वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल असा तगादा महादेव पत्नी राधा हिच्याकडे लावत होता. तुला आता लेकरू होणार नाही असे म्हणून रोज तो तिला मारहाण करायचा.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने राधालाही मूलबाळ होणार नव्हते हे तिला माहीत असल्याने ती नवऱ्याला म्हणायची आपण शस्त्रक्रिया पलटून घेऊ. काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेसाठी हे दाम्पत्य बीडच्या एका खासगी दवाखान्यात आले. मात्र, त्यासाठी त्यांना ३० हजारांचा खर्च सांगण्यात आला. या ठिकाणीही महादेवने पत्नीला शिवीगाळ केली होती. परतल्यानंतर त्याने राधाला बेदम मारहाण केली. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला. त्यावेळेस माहेरच्यांनी पैसे देऊ म्हणून सांगितले.

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

रक्ताच्या थारोळ्यात
रात्री महादेव रेड्डे याने त्याची पत्नी राधा हिचे हातपाय बांधून पहाटे तीन वाजेपर्यंत लाकडी दांड्याने मारहाण केली. त्याने तीच्या संपूर्ण शरीरावर मारहाण केली आणि पहाटेच घरातून निघून गेला. सकाळी नऊ वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राधाने शेजारच्यांना हाक देऊन बोलावून घेतले. तिला जवळच्या निपाणी जवळका येथील दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिने प्राण सोडले. महादेव रेड्डे याच्या विरोधात मृत राधाचा भाऊ सुनील राधाकिसन बांगडे (रा. चित्तेगाव, ता. पैठण) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा नोंद झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat Elections : राज्यातील 15,155 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार! 'या' दिवशी प्रसिद्ध होणार अंतिम मतदार यादी; कधी होणार मतदान?

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारचा निर्णय

ROHIT SHARMA RECORDS: रोहित शर्माचे 'हे' ५ जागतिक विक्रम मोडणं अशक्य! नंबर १ रेकॉर्ड तर कदाचित कधीच तुटणार नाही

Latest Marathi News Live Update : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये खुला केला जाईल

Success Story : एका मिस्ड कॉलने बदलले नशीब! भारतीय इंजिनिअरने अमेरिकेत उभी केली 8300 कोटी रुपयांची AI कंपनी, नेमकं कसं केलं पाहा

SCROLL FOR NEXT