Beed Police News 
मराठवाडा

Video : बीड पोलिसांच्या लाडक्या जॉनीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जालिंदर धांडे

बीड : बीड पोलिस दलातील जॉनी या श्वानाचे अल्पश: आजाराने रविवारी (ता. १०) सकाळी साडेसहा वाजता निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. जॉनीच्या अंत्ययात्रेत वरिष्ठ पोलिस अधिकारी सहभागी झाले. जॉनीच्या जाण्याने अधिकारीही भावुक झाले. पोलिसांच्या विशेष वाहनात निघालेल्या अंत्ययात्रेत सर्वच अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

२६ ऑक्टोबर २०११ ला जन्मलेला जॉनी बीड पोलिस दलात सहभागी झाला. पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात त्याने सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. जॉनी बीड पोलिस दलाच्या बॉम्बशोधक पथकात कार्यरत होता. विविध गुन्ह्यांच्या तपासात त्याने बीड पोलिसांची मोठी मदत केली. त्याचा अनेक पुरस्कारांनी गौरवही झाला.

२०१३ ला औरंगाबादला झालेल्या पोलिस कर्तव्य मेळाव्यात जॉनीने प्रथम पारितोषिक पटकावले. तर, २०१४ हरियाणात झालेल्या अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातही त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. २०१५ मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र पोलिस कर्तव्य मेळाव्यात त्याचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान झाला. त्याचबरोबर त्याने पंढरपूरच्या आषाढी, कार्तिकी वारीसह नागपूरचे हिवाळी अधिवेशन, तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तातही सहभाग घेतला होता. 

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या जॉनीचे रविवारी सकाळी निधन झाले. दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयातून त्याची अंत्ययात्रा निघाली. त्याच्यावर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या विशेष वाहनातून जॉनची अंत्ययात्रा निघाली. जीपला बांधलेली दोरी सर्वच अधिकाऱ्यांनी ओढून एकप्रकारे जॉनीला खांदा दिला. हवेत बंदुकीच्या फैरी झाडून जॉनीला मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest : जंतरमंतरवरील आंदोलन भोवले ! सौरव दास, आशुतोष रांका अन् अजिंक्य शिंदेला अटक; थोड्याच वेळात दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करणार

Ashti Accident: वर्ध्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना; वाहत्या कॅनलमध्ये पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Navratri Day 4: कूष्मांडा देवी

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत बोट उलटली; १३ जणांचा मृत्यू, दोघांना वाचविण्यात यश

Navratri Upvas Recipe: उपवासासाठी बनवा खमंग गुजराती हांडवो; बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT