Shubham Sapkal Beed Crime News 
मराठवाडा

म्हशीवर करणी केल्याचा बदला, भावकीतील लोकांनीच चिमूरड्या शुभमचा...

सकाळ वृत्तसेवा

नेकनूर (जि.बीड) : नेकनूर परिसरातील रत्नागिरी (ता. बीड) येथे शाळेच्या आवारात बुधवारी (ता. तीन) मृतावस्थेत आढळून आलेल्या बालकाचा खून झाला असून करणीच्या संशयातून तो करण्यात आला असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी भावकीतीलच दाम्पत्याला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून म्हशीला करणी केल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली रोहिदास नवनाथ सपकाळ व देवईबाई रोहिदास सपकाळ या दाम्पत्याने दिली.


बुधवारी शुभम ऊर्फ राज मोतीराम सपकाळ (वय ६) या बालकाचा मृतदेह आढळला होता. रत्नागिरी येथे बुधवारी सकाळी काही मुले शाळेत खेळण्यासाठी गेले. काही वेळाने या ठिकाणी शुभमचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्याभोवतीच्या लालसर खुणांमुळे त्याचा खून झाल्याचा संशय होता. त्याची उत्तरीय तपासणी बुधवारीच अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झाली. यामध्ये मुलाचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.


त्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपासाची गती वाढविली. सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी देवईबाई व रोहिदास नवनाथ सपकाळ या भावकीतील दाम्पत्याला संशयावरून ताब्यात घेतले. दाम्पत्याने खुनाची कबुली दिली असून आमच्या म्हशीला करणी करून ठार मारल्याचा बदला घेण्यासाठी खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, मुले खेळत असताना रोहिदास सपकाळ याने शुभमला उचलून बाजूला नेले आणि त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याला शाळेच्या आवारात आणून टाकले.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT