Jalna Crime esakal
मराठवाडा

जालन्यात मोठा दरोडा; चार महिला गंभीर जखमी, साडेचार लाखांचे दागिने लुटले

पाच दरोडेखोरांनी घरात घुसुन महिलांना कुऱ्हाड, लोखंडी राॅड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण करीत..

गजानन उदावंत

जाफराबाद (जि. जालना) : तालुक्यातील पिंपळखुटा शेत शिवारातील राजु खोसरे यांच्या शेतातील घरावर चार ते पाच दरोडेखोरांनी घरात घुसुन महिलांना कुऱ्हाड, लोखंडी राॅड आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण करीत अंगावरील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने जालन्याच्या (Jalna) सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी (ता.२५) रोजीच्या मध्यरात्री बारा वाजेनंतर घडली. जाफराबाद (Jafrabad) पिंपळखुटा शेत शिवारात शेतात राहणाऱ्या राजु रामदास खोसरे यांच्या घरातील एका खोलीची कडी लावून दुसऱ्या खोलीत चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवेश केला. (Big Robbery In Jalna, Four Women Injured)

त्यानंतर सखुबाई रामदास खोसरे, रंजना संजय गाडेकर, लता रमेश गाडेकर, सुनीता कैसाल देवडे यांना कुऱ्हाड, लोखंडी राँड आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत अंगावरील सोन्या चांदीचे दागिने काढुन घेतले. चांदीचे कडवळे, गळ्यातील सोन्याची पोथ, मनी मंगळसुत्र, नाकातील नथ, कानातील सोन्याचे दागिने, यासह घरातील लोखंडी पेटी उचकटुन त्यातील रोख १५ हजार आणि सोन्याची अंगठी लंपास केली. असा सुमारे साडेचार लाखांचा ऐवज दरोडे खोरांनी लंपास केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे, पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचे अवलोकन केले. तसेच घटनास्थळ पंचनामा केला.

तसेच दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी सुनिता कैलास देव्हडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश जायभाये हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT