beed pakshi 2.jpg 
मराठवाडा

मुकुंदराज परिसरात आढळले ५१ प्रजातींचे पक्षी 

अनिरुद्ध धर्माधिकारी

अंबाजोगाई (बीड) : पक्षी सप्ताहनिमित्त येथील पक्षिमित्रांनी रविवारी (ता.आठ) मुकुंदराज परिसरात केलेल्या निरीक्षणात ५१ प्रजातींचे पक्षी आढळले. सध्या नद्या, तलावात पाणी असल्याने स्थलांतरित पाणपक्षी काही प्रमाणात यायला सुरवात झाली आहे. 

अंबाजोगाई तालुक्यात पाच ते १२ नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताह साजरा झाला. यानिमित्त अंबाजोगाईच्या बुट्टेनाथ व मुकुंदराज परिसरात पक्षिमित्रांनी निरीक्षण केले. देशाच्या इतर भागातून व परदेशातून हिवाळ्यात स्थलांतर करणारे पक्षी यायला प्रारंभ झाल्याचे या निरीक्षणात आढळले. 

असे आढळले पक्षी 
पक्षिमित्रांच्या दोन तासांच्या निरीक्षणात करडा धोबी, पांढरा धोबी, कवड्या धोबी, पाषाण गोजा, कृष्ण थिरथिरा, श्वेतकंठी वटवट्या, लाल मुनिया, वेणू वटवट्या, गोरली, भारीट आदी ५१ प्रकारचे पक्षी आढळले. पक्षिमित्रांनी मुरंबी तलावावर फेरफटका मारला असता दरवर्षी येणारे पाणपक्षी मात्र अजून आलेले आढळले नाहीत. तुतवार, नकटा, हाळदीकुंकू, थापट्या असे काही पक्षी तुरळक संख्येने दिसले. 

या पक्षिमित्रांचा पुढाकार 
पक्षीनिरीक्षणात डॉ. शुभदा लोहिया, मुन्ना सोमाणी, नीरज गोड, डॉ. सुशील घाडगे व अभिजित लोहिया यांनी पुढाकार घेतला. मुकुंदराज परिसरात एस ग्रुपने, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पक्षीनिरीक्षण केले. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठ्यांचं आंदोलन त्रास देऊन बंद पाडण्याचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल; चार दिवसांपासून कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू, नेमकं कारण काय?

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांची दुसरी पिढी बिनविरोध; ९ जागा बिनविरोध, १२ जागांवर लढत

सचिनच्या निरोपाच्या सामन्यात १० विकेट घेतल्या, सामनावीर ठरूनही पुन्हा संधीच मिळाली नाही; आता तोच निवडणार संघ

माझं सगळं जग एकाच जागी... नाना पाटेकरांना जाऊन १४ दिवस झाले; मुलगा मल्हार भावुक होत म्हणाला- त्यांना...

SCROLL FOR NEXT