file photo
file photo 
मराठवाडा

‘उर्दू’ शाळेच्या मुख्याध्यापिकेसह सहशिक्षिकेवर.... 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : इयत्ता चौथीच्या विद्यार्थीनीला शाळेत बसु देण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिकेसह एका सहशिक्षिकेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून वजिराबाद पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १३) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही शिक्षिका सध्या पसार आहेत.

शहराच्या वाघी रस्त्यावर तहुराबाद परिसरात सफा उर्दू शाळा आहे. या शाळेत तक्रारदार यांची मुलगी इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेते. मात्र त्या विद्यार्थीनीची घरची परिस्थिती बीकट असल्याने तिच्या पालकांनी फिस भरली नसल्याने मुख्याध्यापिका सय्यदा सिमा कौसर मीर सादतअली हीने त्या विद्यार्थीनीस वर्गात बसु दिले नाही. वर्गात बसु द्या अशी विनंती तिच्या पालकांनी केली मात्र मुख्याध्यापक व वर्गशिक्षिका शगुता गौहर हाजी महमद इस्माईल यांनी नकार दिला. वर्गात बसु द्यायचे असेल तर एक हजार ६०० रुपये लाच द्यावी लागेल असे सांगितले. खरे तर ही शाळा शासनमान्य असून कुठलीच मुलींना फीस लागत नाही. तरीसुद्धा या शेथातील या लाचखोर शिक्षिकांनी गरीब पालकास त्रास दिला. तडजोडअंती अक हजार रुपये देण्याचे ठरले. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल

मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात येऊन ता. ११ मार्च रोजी तक्रार दिली. या तक्रारीवरुन सर्व प्रकरणाची पडताळणी एसीबी विभागाने केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातही चौकशी केली. अशा पद्धतीची फीस आकारता येत नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर एसबीच्या पथकांनी शाळा परिसरात लाच मागणीचा पडताळणी सापला लावला. शुक्रवारी वरील दोन्ही शिक्षिकांनी एक हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिस निरीक्षक एस. एल. नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. एल. नितनवरे, कर्मचारी किशन चिंतोरे, हनमंत बोरकर, गणेश तालकोकुलवार, आशा गायकवाड, श्रीमती जाधव आणि मारोती सोनटक्के यांनी यशस्वी केली.  

एसीबीकडून नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी व कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा अपहार केला असले तर आमच्या टोल फ्री १०६४ किंवा०२४६४ -२५३५१२ या क्रमांकावर किंवा चलभाष क्रमांक ८९७५७६९९१८ यावर संपर्क साधावा.
विजय डोंगरे, पोलिस उपाधीक्षक, एसीबी, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT