A bulldozer of Udgir Municipal Council has been deployed on the encroachment by a court order 2.jpg 
मराठवाडा

न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमणावर उदगीर नगरपरिषदेचा बुलडोझर

सचिन शिवशेट्टे

उदगीर (लातूर) : बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे मंगळवारी ( ता.१५) नगर परिषद बुलडोझर लावून अनाधिकृत बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे अनाधिकृत बांधकामधारकाचे धाबे दणाणले आहेत.

तत्कालीन प्रशिक्षीत मुख्याधिकारी सुहास खोडवेकर यांनी मागील काळात शहरातील बसस्थानक, चौबारा रोड, जयजवान चौकातील अनाधिकृत बांधकाम पाडून मोठी कार्यवाही केली होती. त्यावेळी शिवाजी सोसायटीतील बांधकाम पाडत असल्यामुळे चंद्रपाल प्रभातराव पाटील यांनी १४ जून २०१९ रोजी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने पुढील सुनावनी होईपर्यत कुठलेच बांधकाम पाडण्यात येऊ नये, असा आदेश दिल्यामुळे नगर परिषदेने अनाधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम थांबली होती. 

२१ नोहेंबर रोजी नगर परिषद प्रशासनाची बाजू लक्ष्यात घेऊन बसस्थानकासमोरील मुख्य रस्तालगतच्या सार्वजनिक रस्तावरील अतिक्रमण एक महिन्याच्या आत काढून टाकण्याचा आदेश होता. तेच आदेश दोन डिसेंबर रोजी नगर परिषदेला प्राप्त झाल्याने नगर परिषदेच्या पथकाने अनाधिकृत बांधकाम पाडण्याची धडक कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी नगर परिषदेच्या पथका सोबत  मुख्याधिकारी भरत राठोड उपस्थित  राहून कार्यवाही करत आहे. यावेळी कुठलाच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT