Crimenews.jpg 
मराठवाडा

परळी : बोगस बियाणे प्रकरणी या कंपनीवर झाला गुन्हा दाखल..!

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ : सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड (औरंगाबाद) या कंपनीविरोधात येथील तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

अनेक वर्षांनंतर यंदा मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी केली; मात्र बाजारात बोगस बियाणे आल्याने पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यानंतर शासनाने कृषी विभागाकडून पंचनामे केले; तसेच याची दखल उच्च न्यायालयाने घेतली व बोगस बियाणे कंपन्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

तालुक्यात हजारावर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पंचनामे करण्यात आले होते. पंचनाम्यात ग्रीन गोल्ड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोयाबीन बियाणे वाण जी ३३४४, जे ३५५३, जी ३०६ व इतर बियाणांचा पेरा पेरणी झालेल्या ठिकाणी पाहिला असता हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तालुका तक्रार निवारण समितीच्या पाहणीत स्पष्ट झाले.

त्यामुळे तालुका कृषी अधिकारी श्री.सोनवणे यांनी येथील पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. दोन) तक्रार दाखल केल्यानंतर कंपनी व व्यवस्थापक संदीप बावस्कर (गंगापूर, औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देणार, खासदारांची मागणी

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

जुळून येती रेशीमगाठीनंतर पहिल्यांदा झी मराठीवर दिसणार ललित प्रभाकर, 'या' मालिकेत पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Gas Cylinder Shortage : अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र बंद; भाविकांच्या अन्नाचा प्रश्न ऐरणीवर, प्रसादाचा लाडू सुद्धा बंद

SCROLL FOR NEXT