Coal Like Rock Found In Umarga  esakal
मराठवाडा

उमरग्यात विहिर खोदताना आढळला कोळसासदृश्य खडकाचा थर ! खडकातुन येतो आवाज

नैसर्गिक साधन संपत्तीचा शोध घेण्याची गरज

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील डोंगराळ भागात असलेल्या कदमापुर शिवारात विहिर खोदताना पन्नास फुटावर कोळसासदृश्य खडकाचा थर आढळल्याने तरुण, शिक्षित शेतकऱ्याला हा नैसर्गिक साधनसंपत्तीची शक्यता वाटते आहे. दरम्यान काळ्या रंगाचा, थोडा मृदु खडक विहिर खोदल्यानंतर बाहेर काढण्यात आला. हलक्या पावसामुळे खडकाच्या आजोऱ्यातुन अचानकपणे जवळपास दहा मिनिट हलका आवाज येत असताना तरूण शेतकरी प्रशांत भोसले यांना हा काही तरी नवीन प्रकार असल्याचे लक्षात आले. उस्मानाबाद जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात डोंगराळ भाग आहे. तसा भाग उमरगा (Umarga) तालुक्यातील कदमापूर गाव शिवारातही आहे. मुळात गावही दगड, माती आणि विशिष्ट खडकाळ भागात वसलेले आहे. शिवारातील शेतीतही डोंगराळ भागात आहे. बी.एस्सीचे शिक्षण घेतलेले प्रशांत सुभाष भोसले यांनी डोंगर भागातील स्वतःच्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावंलबन योजनेतून विहिरीचे काम सुरु केले. (Coal Like Rock Found In Well In Umarga Of Osmanabad District)

साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी विहिर खोदताना पन्नास फुटावर काळसर रंगाचा जवळपास दोन ते अडीच फुट रुंदीचा थर होता. पोकलेनने तो आजोरा बाहेर काढण्यात आला. तेव्हा भोसले यांना याचे काही नावीन्य वाटले नाही. मात्र चार दिवसानंतर अचानक आलेल्या पावसाचे थेंब जसे जसे पडत होते तसे त्या कोळसासदृश्य खडकातुन चुईंग ...चुईंग असा सुरू झाला. हा आवाज नेमका कुठुन येतो याचा पहिल्यांदा लक्षात आले नाही. बारकाईने पाहिल्यास त्या खडकातुन आवाज येत होता. तेव्हा भोसले यांनी दुसऱ्या दिवशी त्या खडकावर पाणी टाकुन प्रयोग केला, तेव्हाही आवाज येण्याचा अनुभव आला. यामुळे भोसले यांची चिकित्सक वृत्ती वाढली. त्यांनी त्या खडकाला पेटविण्याचा प्रयत्न केला. अधिक उष्णता दिल्यानंतर तो जळतो असे दिसून आले. दरम्यान या प्रकाराची माहिती श्री. भोसले यांनी त्यांचे वर्गमित्र अमोल भोसले यांना दिली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस, सामाजिक कार्यकर्ते कॉ. अरूण रेणके, श्री. भोसले यांनीही या नवीन प्रकाराची प्रत्यक्षात पाहणी केली.(Osmanabad)

विहिर खोदताना निघालेला कोळसासदृश्य खडकात क्षारयुक्त असलेले एक थर आहे. अधिक खोलवर गेल्यानंतर उष्णता आणि घनताही वाढलेली असते. त्यामुळे पाणी पडल्यानंतर त्यातून आवाज येतो. त्यात कार्बनचा प्रकारही असू शकतो. भूगर्भ तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर याची अधिक स्पष्टता होऊ शकते.

- डॉ. डी. एस. इटले, भूगोल विभागप्रमुख, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय

भूगर्भात दडलेले अनेक खनिज, नैसर्गिक साधन संपत्ती संशोधनानंतर मानवी जीवनासाठी उपयूक्त ठरू शकतात. उस्मानाबाद जिल्ह्यात शंभर, दोनशे वर्षापूर्वी भूगर्भातील अनेक घडामोडी झाल्याची माहिती सांगितली जाते. १९९३ च्या भूकंपाचा संदर्भही या निमित्ताने समोर येतो. कोळशासारखा दिसणारा खडक आणि त्याची गुणवैशिष्टये याचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांच्यादृष्टीने ती महत्वाची ठरेल.

- कॉ. अरुण रेणके, जिल्हा सरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष

विहिर खोदताना पन्नास फुटांपर्यंत तांबड्या रंगाचे खडक आणि पाषणासारखे मोठे दगड काढावे लागले. त्यानंतर कोळश्या सारख्या प्रकाराचा एक थर आढळून आला. पावसानंतर एकदम सुरु झालेल्या आवाजाने पहिल्यांदा भिती वाटली. मात्र एक - एक प्राथमिक प्रयोग केल्याने नावीन्य वाटते. भूगर्भ संशोधन विभागाने या नेमक्या प्रकाराचा शोध घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

- प्रशांत भोसले, शेतकरी, कदमापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT