file photo 
मराठवाडा

महावितरणची ‘गो-ग्रीन' सेवा ग्राहकांची पसंद

प्रल्हाद कांबळे

नांदेड : वीजबिलासाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या 'गो-ग्रीन' या पर्यावरणपुरक योजनेत आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक पर्यावरणस्नेही ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागात सर्वाधिक ४० हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणकडून 'गो-ग्रीन' योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त 'ई-मेल'चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांची वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल 'ई-मेल' तसेच 'एसएमएस'द्वारे दरमहा मिळणार असल्याने ते लगेचच प्रॉम्ट पेमेंटसह ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे.

महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळ

तसेच वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर वीजबिल मूळ स्वरुपात उपलब्ध असून ते डाऊनलोड किंवा प्रिंट करण्याची सोय आहे.

एक लाख तीन हजार ९१८ वीजग्राहकांनी 'गो-ग्रीन' योजनेत सहभाग

महावितरणमध्ये आतापर्यंत एक लाख तीन हजार ९१८ वीजग्राहकांनी 'गो-ग्रीन' योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागातील ४० हजार ६९ ग्राहकांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर कोकण प्रादेशिक- ३७ हजार ८००, नागपूर प्रादेशिक- १३ हजार ७१७ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागातील १२ हजार ३३२ वीजग्राहकांचा समावेश आहे. 

परिमंडलनिहाय पर्यावरणस्नेही ग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे: 

पुणे परिमंडल- २४ हजार ९७५, बारामती- आठ ३३०, कोल्हापूर- सहा ७६४, नागपूर- चार हजार २४९, गोंदिया- एक हजार २८८, चंद्रपूर- एक हजार ४१४, अमरावती- दोन हजार ९२७, अकोला- तीन हजार ८३९, नाशिक- १० हजार ५८३, कोकण- दोन हजार १६१, कल्याण- १० हजार १३२, जळगाव- पाच हजार ३९४, भांडूप- नऊ हजार ५३०, औरंगाबाद- पाच हजार ३१०, लातूर- चार हजार ३५ आणि नांदेड परिमंडळात दोन हजार ९८७ वीजग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी 'ई-मेल' व 'एसएमएस'ला पसंती दिली आहे. 

महावितरणच्या संकेतस्थळाची लींक

'गो-ग्रीन'चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपुरक योजनेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart ची ऑफर खरी वाटली, पण अभिनेत्याला कळलंच नाही अन् खातं रिकामं झालं, वाचा नाहीतर तुमचा खिसाही होईल रिकामा

CM Yogi Adityanath: गोरखपूरला नव्या ओव्हरब्रिजची भेट! १३७.८३ कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण; सीएम योगींचा विरोधकांवर घणाघात

Parbhani News: शेती गमावण्याचा धक्का! दारू पाजून फसवणूक केल्याच्या तणावातून शेतकऱ्याने संपवले जीवन

मध्यरात्री Epstein Files केल्या जारी; १२०० पीडित मुली, ३५०० फाइल्स, हजारो फोटो, DVD आणि कागदपत्रं

Shashikant Shinde : अजित पवारांकडून अद्याप प्रस्ताव नाही; आघाडीबाबत पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT