3corona_1180
3corona_1180 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात ५० जणांना कोरोना, दिवसभरात १३० रुग्ण झाले बरे

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पण मृत्युचा दर वाढत असल्याने चिंता कायम आहे. मृत्युचा दर कमी झाल्यास जिल्ह्यातील कोरोनाचा धोका टळण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.१२) ५० जणांना कोरोनाची लागण झाली असुन एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवसभरामध्ये १३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ११ हजार ३६३ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये १४३ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविले होते. त्यातील १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ३०९ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यातील १९ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. उस्मानाबाद तालुक्यात १४ रुग्णांना लागण झाली आहे. त्यामध्ये १२ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन दोघांचे प्रयोगशाळेतुन आलेले अहवाल पॉझिटिव्ह आले. तुळजापुर तालुक्यातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सातही जणांचे स्वॅब घेण्यात आले होते.

उमरगा येथे सहा जणांना लागण झाली असुन त्यातील चार जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन एक जणाचा स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर एक जण परजिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. लोहाऱ्यात तीन जणांना लागण झाली आहे. तिघांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कळंब येथील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील तिघांना परजिल्ह्यामध्ये लागण झाल्याची नोंद आहे.

वाशी तालुक्यातील दहा जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी सात जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, तर दोघांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एक जण परिजिल्ह्यामध्ये बाधित झाल्याची नोंद आहे. भूम येथील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील दोघे परजिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. एक जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंड्यात एक जणाचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उमरगा तालुक्यातील कोरल गावच्या ४८ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाला असून तेथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यु झाला आहे.


उस्मानाबाद कोरोना मीटर
एकुण रुग्णसंख्या - १३४२६
बरे झालेले रुग्ण- ११३६४
उपचाराखालील रुग्ण- १६३०
एकुण मृत्यु - ४३२
आजचे बाधित - ५०
आजचे मृत्यु - ०१
 


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सुरुवातीच्या मोठ्या धक्क्यांनंतर सूर्यकुमारचे दमदार अर्धशतक, तिलकनेही दिली भक्कम साथ

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT